Ration card: 80 कोटी नागरिकांना पंतप्रधान मोदींचे दिवाळी गिफ्ट; 5 वर्षे मिळणार मोफत रेशन शिधा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना शनिवारी दिवाळी गिफ्ट दिले. पंतप्रधान मोदी यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी पाच वर्ष वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरीब कुटुंबियांना पुढील पाच वर्ष मोफत शिधा दिला जाणार आहे. माहितीनुसार, ८० कोटी नागरिकांना या योजनेचा लाभ होत आहे.

 

 मोफत राशन यादीत तुमचे नाव आहे का? पहा

येथे क्लिक करा

 

छत्तीसगडमध्ये मोदींची घोषणापंतप्रधान मोदी सध्या छत्तीसगडमध्ये निवडणुकीचा प्रचार करत आहेत. यावेळी दुर्गे येथे सभेला संबोधित करताना त्यांनी मोफत शिधा योजना पाच वर्षांसाठी वाढवत असल्याची घोषणा केली.

छत्तीगडमध्ये या महिन्यात निवडणुका होणार आहेत. यापार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या या घोषणेकडे पाहिलं जात आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या एकूण ९० जागा आहेत. येथे दोन टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. Ration card online

डिसेंबरमध्ये कालावधी संपणार होताप्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा कालावधी डिसेंबरमध्ये संपणार होता. पण, निवडणुकीच्या तोंडावर कालावधी वाढवण्याचा निर्णय घेऊन राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या योजनेंतर्गत गरिबांना पाच किलो गहू किंवा तांदूळ मोफत मिळते. केंद्र सरकारने ही योजना ३० जून २०२० मध्ये सुरु केली होती. कालावधी वाढवल्यामुळे आता या योजनेचा डिसेंबर २०२८ पर्यंत लाभ घेता येईल. (Latest Marathi News)

 

 सरसकट पीक विमा जाहीर नुकसानभरपाई वाटप सुरु

यादीत नाव पहा 

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!