जागतिक स्तरावर एका मागोमाग होणाऱ्या या सकारात्मक घडामोडीमुळे गुंतवणूकदारांनी सोन्यातील गुंतवणूक कमी करून पुन्हा आपला मोर्चा शेअर मार्केटकडे वळवला आहे. यामुळे मार्केटमध्ये तेजी आली असून सोन्याची झळाळी मात्र उतरली आहे.
मंगळवारी शेअर बाजारात 1281 अंकांची घसरण झाली होती, मात्र बुधवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये तेजी दिसून आली. सुरुवातीलाच सेन्सेक्स 175 अंक, तर निफ्टी 51 अंकांनी वधारला. त्यानंतर बाजारात उत्साह दिसून आला आणि सेक्सेक्ससह निफ्टीतही मोठी वाढ झाली.