Heatwave Alert : भारतीय हवामान खात्याने देशातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. या राज्यांमध्ये तेलंगणा, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
उष्णतेची लाट म्हणजे काय?
उष्माघाताचा आरोग्यावर होणारा परिणाम
घरीच राहा
उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी शक्यतो घरातच रहा. उन्हाच्या वेळी घर किंवा ऑफिसच्या बाहेर जाणे टाळा. दिवसा घर थंड ठेवण्यासाठी पडदे काढा. रात्री थोडा वेळ खिडक्या आणि दरवाजे उघडा जेणेकरून घर थंड होईल. गरजेनुसार एसी, पंखा आणि कुलर वापरा.
जास्त पाणी प्या
उन्हाळ्यात जास्त घाम येतो आणि शरीरात डिहायड्रेशन होण्याची शक्यताही वाढते. अशा परिस्थितीत दररोज 2-3 लिटर पाणी प्या. उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी ताक, नारळपाणी, रस, लिंबू व इतर द्रवपदार्थांचे सेवन करा.
सनस्क्रीन वापरा
दिवसा बाहेर जाण्यापूर्वी त्वचेवर सनस्क्रीन लोशन लावा. शरीराच्या सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या भागांवर सनस्क्रीन लावल्याने सूर्याच्या हानिकारक किरणांपासून तुमचे संरक्षण होईल.
सैल कपडे घाला
उन्हाळ्यात खूप घट्ट कपडे घालणे टाळा. सिंथेटिक कपड्यांऐवजी कॉटनचे कपडे घाला. सैल आणि सुती कपडे परिधान केल्याने घाम लवकर सुकतो.
(वरील माहिती ही सामान्य माहिती आहे कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा आम्ही करत नाहीत. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)