गृहकर्जाद्वारे अनेक कुटुंबांना घर घेण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यास मदत होते. परंतु, गेल्या वर्षभरात ज्या प्रकारे गृहकर्जाचे व्याजदर वाढले आहेत, त्यामुळे गृहकर्ज घेणाऱ्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. Home loan

गेल्या वर्षी मे महिन्यापासून आरबीआयनं रेपो दरात सहा वेळा वाढ केली आहे. या वाढीनंतर रेपो रेट आता ६.५ टक्के झाला आहे. यामुळे गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्ज महाग झालं आहे. लोकांचा ईएमआय खूप वाढला आहे. ज्यांना जास्त ईएमआय नकोय त्यांच्यासाठी बँकांनी कर्जाचा कालावधी वाढवलाय.

गृहकर्जाचं ओझं कमी करण्याच्या उपाययोजनांकडे लोकांचा कल वाढला आहे. लोकांना त्यांच्या ईएमआयचं ओझं कमी करण्याच्या पर्यायांबद्दल जाणून घ्यायचे आहे. याबाबत लोक तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत. यामध्ये फ्लोटिंग रेटची निवड, गृहकर्जाचं प्रीपेमेंट आणि कमी दरानं कर्ज देऊ शकेल अशी बँक शोधणे यांचा समावेश आहे. चला या पर्यायांबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

👉व्याजदर कमी करायचय या टिप्स वाचा येथे क्लिक करा

या पद्धतीने प्रीपेमेंट करा

प्रीपेमेंट केल्यानं तुमच्या एकूण कर्जाची रक्कम कमी होईल. यामुळे तुमचा EMI देखील कमी होईल. तुम्ही बँकेला एकरकमी रक्कम देऊन तुमच्या कर्जाचा काही भाग प्रीपे करण्याचा पर्याय निवडू शकता किंवा तुम्ही वेळोवेळी काही रकमेची परतफेड करू शकता. प्रीपेमेंट तुम्हाला व्याजच्या रकमेत बचत करण्यास देखील मदत करतं. दीर्घकाळात खूप फरक पडतो. काही बँका प्रीपेमेंटवर दंड आकारतात. त्यामुळे तुम्ही त्याबाबत आधी तपासून पाहणं योग्य ठरेल. जर तुम्हाला प्रीपेमेंटचा अधिक फायदा होत असेल, तर दंड भरण्यात काही नुकसान नाही. Home loan

👉व्याजदर कमी करायचय या टिप्स वाचा येथे क्लिक करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!