Video Viral: नवरा बायकोचं नातं हे विश्वास आणि प्रेमावर अवलंबून असतं. त्यातील एकानेही घराबाहेर दुसरं नातं बनवलं तर त्या नात्याला तडा जातो. नवरा बायकोमधील नात्याचा मूळ असतो तो म्हणजे विश्वास…एकमेकांवर काय प्रेम करु आणि एकनिष्ठ राहू असं लग्नाच्या विधीवेळी आपण वचन देतो.
जसं नवरा बायकोचं नातं हे प्रेम आणि विश्वासावर असतं तसंच प्रियकर आणि प्रियसीचं नातं असतं. आज काल एकाच वेळी दोन जणांशी नाती ठेवल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. सोशल मीडियावर विश्वासाला तडा जाणारी एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटर @ManojSh28986262 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. आयुष्य खूप छोटं आहे, विश्वास आणि प्रेमाने नाती जपा. जी व्यक्ती तिच्यावर प्रेम करते, विश्वास करते त्यांना कधीही दुखवू नका. धावपळीच्या आयुष्यात नात्याला वेळ द्या. एकमेकांना समजून सुसंवाद आणि वेळ दिल्याने नातं अधिक मजूबत होतं. अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर येत आहेत.