मेंढपाळाचा पोरगा IPS अधिकारी झाला! कशी आहे बिरदेव डोणे यांची संघर्षगाथा?
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावातील रहिवासी सिध्दाप्पा डोणे. पत्नी, दोन मुलं आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार. लहान मुलगा बिरदेव सिद्धाप्पा डोणे याचं नाव सध्या संपूर्ण देशभरात गाजतंय.
पुण्यात इंजिनिअरिंग करत असताना कॉलेजमध्ये यूपीएससीची तयारी करण्यासाठी त्याला चांगलं वातावरण मिळालं. २०१७ मध्ये त्याच्या कॉलेजमधील एकाच वर्षात १७ जणांचं यूपीएससीच्या फायनल यादीत सिलेक्शन झालं आणि हीच गोष्ट त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरली. त्यानंतर त्याने यूपीएससी करण्याची गाठ मनाशी बांधली.
विशेष गोष्ट अशी की, यूपीएससीच्या निकालाच्या दिवशी म्हणजेच मंगळवार, २२ एप्रिल रोजीसुद्धा बिरदेव बकऱ्या घेऊन गेला होता. त्यावेळी तिथेच त्याला त्याच्या मित्राचा फोन आला आणि यूपीएससीमध्ये तुझा ५५१ वा रँक आल्याचं सांगितलं. त्यानंतर बिरदेवच्या आनंदाला पारावार नव्हता. त्याच्या कुटुंबियांनी तिथेच त्याच्या यशाचा आनंद साजरा केला.
इतक्या कमी वयात देशाच्या सर्वोच्च सेवांमध्ये स्थान मिळवणं ही बिरदेवसह सर्वांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. त्यात इतक्या कठीण परिस्थितीतही मोठं काहीतरी करण्याचं स्वप्न बघणं आणि ते पूर्ण करण्यासाठी वाट्टेल ते करणं ही गोष्ट प्रत्येकाने बिरदेवकडून शिकण्यासारखी आहे. आज एमपीएससी, यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या देशभरातील लाखों तरुण-तरुणींसाठी बिरदेव डोणे हा प्रेरणास्थान बनलाय. तुमच्याकडे एखाद्या गोष्टीत स्वत:ला झोकून देऊन काम करण्याची शक्ती असेल तर यश तुमच्याकडे आपोआप चालत येईल, हेच बिरदेवच्या या यशातून सिद्ध होतंय. सर्वात महत्वाचं म्हणजे आकाशाला गवसणी घातलेली असतानाही पाय जमिनीवर कसे ठेवायचे हेदेखील बिरदेवकडून शिकण्यासारखं आहे.
ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग दरम्यान तरुणाने गमावला जीव व्हिडिओ व्हायरल