दोन्ही सभागृहाच्या समितीचे इतिवृत्त आज सभागृहात मांडले जाणार आहे. त्यामुळे विरोधक नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. Jansuraksha Act
जनसुरक्षा कायदा म्हणजे काय?
सध्या महाराष्ट्रात जनसुरक्षा विशेष कायद्याची गरज काय?
1) हा अधिनियम आणि त्याद्वारे भविष्यात होणारा कायदा प्रामुख्याने अंतर्गत सुरक्षेशी संबंधित कायदा असून नक्षलवादी / माओवादी तसेच अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या संघटना आणि व्यक्ती वर कारवाई करण्यासाठी आहे.
4) महाराष्ट्राचा स्वतःचा विशेष कायदा असावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र जन सुरक्षा विशेष अधिनियम विधिमंडळात मांडले आहे. याचा कायदा झाल्यास महाराष्ट्राचे अंतर्गत सुरक्षेसाठी हक्काचा कायदा राहील आणि त्याद्वारे पोलीस व इतर सुरक्षा यंत्रणांना परिणामकारक कारवाई करता येणार आहे.
Stamp duty: स्टॅम्प ड्युटी झाली माफ राज्य सरकारचा मोठा निर्णय
काय आहे तरतुदी?
1) एखाद्या संघटनेला बेकायदेशीर संघटना जाहीर करता येणार आहे. तसेच त्या संघटनेचे कार्यालय, परिसर, इतर संपत्ती जप्त करता येईल.
2) बेकायदेशीर जाहीर झालेल्या संघटनांच्या बँकामधील खाते गोठवता येईल.
3) संघटनेला बेकादेशीर ठरवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या समकक्ष *तीन सदस्यीय सल्लागार मंडळ असेल. सल्लागार मंडळाच्या परवानगी नंतरच एखाद्या संघटनेला बेकादेशीर जाहीर करता येईल. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याची मनमानी चालेल असं होणार नाही… काही चेक्स एंड बेलेंसेस ठेवण्यात आले आहे.
4) डीआयजी रँकचे अधिकाराच्या परवानगीनेच गुन्हे दाखल करता येईल.
5) किमान पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारीच या गुन्ह्याचा तपास करेल.
6) अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या परवानगीनेच या गुन्ह्यांमध्ये आरोप पत्र दाखल करता येईल. त्यामुळे कायद्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी सरकारने घेतली आहे.
7) बंदी घातलेल्या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नव्या नावाने संघटना उभारून तेच कार्य करत असतील तर नवी उभारलेली संघटना ही मूळ बेकायदेशीर संघटनेचां भाग मानली जाईल, ती ही बेकायदेशीर ठरेल.
8) केंद्र सरकारने गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र राज्याने असा कायदा करावा अशी अपेक्षा ठेवली होती. अंतर्गत सुरक्षा संदर्भात केंद्र सरकारचा निधी राज्यांना दिला जातो. त्या योजनेमध्ये केंद्राकडून अंतर्गत सुरक्षेसाठी निधी मिळवणाऱ्या राज्याने असा सक्षम कायदा करावा अशी अपेक्षा करण्यात आली आहे.