Viral Video: सामान्य कुटुंबातील महिलांच्या आयुष्यातील बराच वेळ त्यांचं कुटुंब, मुलं, नोकरी, घराची जबाबदारी या सगळ्या गोष्टींभोवती फिरत असतो. यापलीकडे जाऊन त्यांना त्यांचा स्वतःचा वेळ फार कमी मिळतो.

पण, त्यातूनही काही हौशी महिला एखाद्या कार्यक्रमात किंवा घरातच डान्स करून आपली आवड पूर्ण करतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये अशाच एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय.

हल्ली सोशल मीडियामुळे अनेक कलाकार नव्याने घडू लागले आहेत. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रील्सद्वारे आपली कला सादर करताना दिसतात. कधी डान्स तर कधी गाणी, अभिनय अशा विविध गोष्टी हौशी कलाकार शेअर करतात. यातील काहींचे व्हिडीओ इतके व्हायरल होतात की ज्यामुळे त्यातील कलाकारांचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. दरम्यान, आता एका महिलेचा डान्स खूप व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरीही कौतुक करताना दिसत आहेत.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरामध्ये महिला ‘राधा तेरी पायल’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करत आहे. यावेळी ती महिला या गाण्यावर बेभान होऊन नाचते. यावेळी ती डान्सच्या वेगवेगळ्या स्टेप्सही करते शिवाय जोर जोरात कंबर हालवून नाचते. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचे हावभावही पाहण्यासारखे असतात. सध्या या महिलेचा हा डान्स तुफान व्हायरल होत आहे.

काय नाचली राव ही.., ‘शरारा शरारा’ गाण्यावर मॅडमनी केला तुफान डान्स; VIDEO पाहून नेटकरी..

 

पाहा व्हिडीओ:

 

 

‘आई ती आई असते’ थेट पिलाला घेऊन पोहचली दवाखान्यात Video Viral

 

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @sangeeta_mishra05 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत नऊ मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून यावर तीन लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

एका युजरने लिहिलंय की, “कसला भारी डान्स केला काकी तुम्ही.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “तुम्ही बॉलिवूडमध्ये जायला हवं”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की, “आईशप्पथ खूप छान नाचता तुम्ही”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “या बाईने मार्केट जाम केलंय”

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!