Kharip Pik Vima: खरीप पिकविमा निधी वितरीत; राज्य सरकारचा मोठा निर्णय जाणून घ्या

Kharip Pik Vima: राज्यातील शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा मिळण्याचा मार्ग सोपा झाला आहे. एकीकडे मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला असून सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाढली आहे. दरम्यान, ६१ कोटी ५२ लाख ३५ हजार ९८१ रुपयांचा राज्याचा पीक विम्याचा हप्त्याची उर्वरित रक्कम शासनाकडून विमा कंपन्यांना वितरित करण्यात आली आहे. त्यामुळे हा हप्ता कंपन्यांना प्राप्त झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा रक्कम लवकरच आता अपेक्षित आहे.

भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी आणि त्या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाच्या शिफारसीनंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या खरीप हंगाम २०२२ अंतर्गत हप्ता विमा कंपन्यांना वितरीत करण्यात आला आहे. राज्यात पीक विम्यासाठी नेमण्यात आलेल्या पाच विमा कंपन्यांना ही रक्कम देण्यात आली असून २०२२च्या खरीप हंगामाकरिता ही रक्कम वितरीत करण्यात आली आहे.

यादीत नाव पहा

कोणत्या आहेत या पाच विमा कंपन्या?

१) भारतीय कृषी विमा कंपनी,
२) बजाज अलियान्झ जनरल इं. कं. लि.,
३) एचडीएफसी इरगो जनरल इं. कं. लि.,
४) आयसीआयसीआय लोम्बार्ड ज.इं लि,
५) युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी

कोणत्या कंपनीला किती रक्कम वितरीत ?

Agriculture Insurance

शेतकऱ्यांच्या खाती कधी येणार नुकसान भरपाई?

२०२२ वर्षात ज्या शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी पीक विमा उतरवला आहे त्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात एकूण ५३ महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड झाला आहे. जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर मराठवाड्यात बहुतांश जिल्ह्यांमध्ये दीड महिन्याचा म्हणजेच २१ दिवसांहून अधिक दिवसांचा खंड झाला आहे. परिणामी, शेतकऱ्यांना खरिपाच्या पिकांसाठी नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. विमा कंपन्यांना वितरीत करण्यात आलेली ही पीक विम्यासाठीची उर्वरित रक्कम असून कृषी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वितरीत निधीनंतर शेतकऱ्यांच्या खाती नुकसान भरपाईची रक्कम लवकरच मिळू शकते. Kharip Pik Vima

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

शासन निर्णय GR पहा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!