krushi sevak bharti कृषि सेवक पदाची जाहिरात प्रसिद्ध, 2109 जागा लगेच अर्ज करा
राज्य शासनाच्या कृषी विभाग व पदुम विभागातील कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक विभाग नाशिक यांच्या अधिनस्त कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट-क संवर्गातील कृषी सहाय्यकांची रिक्त पदे कृषि सेवक म्हणून निश्चित वेतनावर (एकत्रित मानधनावर) नामनिर्देशनाने / सरळसेवेने स्पर्धापरिक्षेव्दारे भरण्याकरिता सदर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठीची सविस्तर जाहिरात कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे.
अभ्यासक्रमाची पीडीएफ PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
परंतु अर्ज करण्याचा कालावधी, अर्ज करण्याची पध्दत, ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना इत्यादी बाबी कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्वतंत्ररीत्या प्रसिद्ध करण्यांत येणार आहेत.
विभागानुसार सविस्तर जाहिरात पहा
Total: 2109 जागा
पदाचे नाव: कृषी सेवक (Krushi Sevak)
अ. क्र. | विभाग | जागा |
1 | अमरावती | 227 |
2 | छ. संभाजीनगर | 196 |
3 | कोल्हापूर | 250 |
4 | लातूर | 170 |
5 | नागपूर | 448 |
6 | नाशिक | 336 |
7 | पुणे | 188 |
8 | ठाणे | 294 |
Total | 2109 |
शैक्षणिक पात्रता: शासनमान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील डिप्लोमा किंवा पदवी किंवा समतुल्य.
वयाची अट: 11 ऑगस्ट 2023 रोजी 19 ते 38 वर्षे [मागासवर्गीय:05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
अधिकृत वेबसाईट – https://www.krishi.maharashtra.gov.in/