Viral Video: महिला प्रोफेसरने विद्यार्थ्यास दिले ‘दिल’, वर्गातच केला विवाह, लग्नाचा व्हिडिओ व्हायरल
Viral Video: विभागप्रमुख लाल बनारसी साडी नेसून विद्यापीठात आल्या होत्या. त्यांच्या हातात गुलाबाच्या फुलांचा हार होता. प्रथम वर्षाच्या एका विद्यार्थ्याने त्यांच्या मांगमध्ये सिंदूर लावला आणि वर्गात एकमेकांना हार घातला.
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !’, ही कविवर्य मंगेश पाडगावकर यांची गाजलेली कविता. परंतु प्रेम करताना काही नियमांचे पालन करावे लागते. मात्र एका महिला प्रोफेसरने प्रेमाच्या सर्व सीमा ओलांडल्या. तिने चक्क वर्गातील विद्यार्थ्यास आपले ‘दिल’ दिले. त्यानंतर वर्गातच त्याच्यासोबत विवाह केला. वरमाला घातली, सिंदूर घातले. पश्चिम बंगालमधील ही घटना आहे. यासंदर्भातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
चौकशी समितीची नियुक्ती
लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापकाविरोधात तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू तपस चक्रवर्ती यांनी सांगितले की, विभागप्रमुखाविरोधात चौकशी सुरू करण्यात आली आहे. त्यांना वर्गातील त्यांच्या वागणुकीचे स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. त्यांनी तोंडी सांगितले की, वर्गात एका प्रोजेक्टसाठी अभिनय केला होता. व्हायरल झालेला व्हिडिओ फ्रेशर्स पार्टीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
शिक्षणतज्ज्ञ काय म्हणतात…
एकमेकांना हार घालणे आणि एकमेकांच्या गळ्यात सिंदूर लावणे हा कोणत्याही अभ्यास प्रोजेक्टचा भाग आहे का, हे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले नाही. या व्हिडिओबाबत शिक्षणतज्ज्ञ म्हणतात की, प्रोजेक्ट आणि फ्रेशर्स पार्टी यात फरक करण्याची गरज नाही. व्हायरल होणारा व्हिडिओ खरोखरच नाटक असेल तर एक स्टेजही असायला हवा.