Ladki bahin yojana महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास लाडकी बहीण योजना राबवली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये मिळतात. दरम्यान तिसऱ्या महिन्याचे अनुदान हे २९ सप्टेंबर रोजी दिले जाणार आहे.

आता महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.

ज्या महिलांनी दुसऱ्या टप्प्यात नोंदणी केली त्यांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या अकाउंटला जमा होत आहे. त्यामुळे आता ज्या महिलांनी पहिल्या टप्प्यात फॉर्म भरलेत त्यांच्याही अकाउंटला लवकरच १५०० रुपये जमा होणार आहेत. (Ladki Bahin Yojana) Aditi Sunil Tatkare

Ladki Bahin Yojana : सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? महत्वाची अपटेड समोर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यामध्ये तब्बल दोन लाख ३१ हजार २९४ नवीन महिलांनी अर्ज केले आहेत. मात्र, आतापर्यंत अनेक महिलांचे बँक खाते आणि आधार नंबर लिंक नसल्याने हजारो महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर बँक अकाउंट आणि आधार नंबर लिंक करावेत.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ३००० रुपये मिळाले होते. त्यानंतर आता सप्टेंबर महिन्यात अर्ज केलेल्या महिलांना ४५०० रुपये मिळणार आहेत, असं सांगण्यात येत आहे. (Ladki Bahin Yojana 3rd Installment)

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे अजून आले नाहीत? ‘हे’ काम लगेच करा

लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत की नाही कसं चेक कराल?

लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक असेल तरच पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे सर्वप्रथम तुमचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक आहे की नाही हे एकदा चेक करा. तुम्ही तुमच्या ऑनलाइन बँकिंग अॅपद्वारे खात्यात पैसे आलेत की नाही ते चेक करु शकतात. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन पैसे आलेत की नाही ते बघू शकतात. तसेच बँकेत जाऊनदेखील पैसे जमा झालेत की नाही चेक करु शकतात.

Ladki Bahin Yojana: सप्टेंबर महिन्यात फॉर्म, मेसेज आला? आता काही तासात जमा होणार पैसे

Home 🏠

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!