Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत की नाही? या सोप्या पद्धतीने चेक करा
महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना राबवली आहे. महाराष्ट्र सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांच्या अकाउंटला १५०० रुपये जमा केले जातात. या योजनेअंतर्गत पहिले दोन हप्ते एकत्र देण्यात आले आहे. Aditi Sunil Tatkare
आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा करण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत सप्टेंबर महिन्याचा हप्ता २९ सप्टेंबरला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. याबाबत आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.या योजनेअंतर्गत तुम्ही घरबसल्या तुमच्या अकाउंटला पैसे जमा झालेत की नाही हे चेक करु शकतात.
लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेत की नाही कसं चेक करायचं?
तुम्ही तुमच्या बँकेच्या अॅपवर जाऊन पैसे आलेत की नाही हे चेक करु शकतात. अॅपवर जाऊन तुम्ही बॅलेंस चेक करु शकतात. किंवा तुमची ट्रान्झॅक्शन हिस्ट्री चेक करा. त्यात तुम्हाला पैसे आलेत की नाही हे चेक करु शकतात.
Ladki Bahin Yojana : सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात किती पैसे येणार? महत्वाची अपटेड समोर
सप्टेंबरमध्ये अर्ज केलेल्या महिलांना किती पैसे मिळणार?
ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केला आहे. त्यांच्या अकाउंटला किती पैसे येणार याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.तर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत त्यांना मागील तीन महिन्याचे ४५०० रुपये एकत्र मिळणार आहे.
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! ‘लाडक्या बहिणीं’च्या तिसऱ्या हप्त्या, ‘या’ दिवशी खात्यात पैसे जमा