Ladki bahin yojana : राज्य सरकारची महत्त्वाच्या लाडकी बहीण योजनेचा आठवा हफ्ता आजपासून जमा होण्यास सुरूवात होणार आहे. ही महिलांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून महिला याची वाट पाहत होत्या.
अखेर तो दिवस आता आला आहे. अनेक महिलांच्या खात्यात आजपासून लाडकी बहीण योजनेचा हफ्ता जमा होईल.
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची पडताळणी अद्याप सुरू आहे. या प्रक्रियेला उशीर लागत आहे. लाभार्थी महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. यामुळे आता पैसे मिळण्यासाठी पुढील काही दिवस लागू शकतात. आजपासून महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरूवात होईल. तसेच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास पुढील चार ते पाच दिवसांची वाट पाहावी लागेल.