येत्या 48 तासांत लाडकी बहिण योजनेचा हप्ता येऊ शकतो पण सरकारी पातळीवर यासंदर्भात अधिकृत दुजोरा प्राप्त झालेला नाही.
मे महिना आता सरत आला असून आज मे महिन्यतील अखेरचा दिवस 31 तारीख आहे. या महिन्याचे 1500 रुपये कधी मिळतील? याबाबत लाभार्थ्यांमध्ये प्रश्न आहे. लवकरच अकरावा हप्ता 31 मेदरम्यान किंवा येत्या 48 तासात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आतापर्यंत बहुतांशवेळा प्रत्येक महिन्याच्या शेवटी त्या-त्या महिन्याचे हप्ते वितरीत केले जात होते, या महिन्यातील आज अखेरची तारीख आहे, मात्र या महिन्याचा हप्ता कोट्यवधी लाभार्थ्यीना मिळालेला नाही. आज यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. मागील महिन्यांत हप्ता कधी मिळणार याची माहिती शेवटच्या आठवड्यात जारी केली होती, त्यामुळे लाडक्या बहिणींना यावेळी हप्ता कधी मिळणार याचीच प्रतिक्षा आहे.
या लाडक्या बहिणींनाच मिळणार ‘मे’ महिन्याचा हफ्ता यादीत नाव पाहा
लाभार्थ्यांच्या पडताळणीबद्दल आदिती तटकरे यांचे भाष्य
महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी “लाभार्थ्यांची पडताळणी” संदर्भात भाष्य केले आहे. त्यानुसार “लाभार्थ्यांची पडताळणी ही कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील सर्वसाधारण व नियमित प्रक्रिया आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीतही ही प्रक्रिया राबवली जाते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ योग्य लाभार्थ्यांनाच देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून, यासाठी अर्जांची पडताळणी ही नियमितपणे चालणारी प्रक्रिया असणार आहे.” असे त्या म्हणाल्या.
2289 सरकारी कर्मचाऱ्यांचा हप्प्त्यावर होता डोळा
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, “या पडताळणी प्रक्रियेत सेवार्थ मधील जवळपास दोन लाख अर्जांची पडताळणी केल्यानंतर त्यात सुमारे 2289 सरकारी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नावनोंदणी केल्याची बाब जानेवारी- फेब्रुवारी दरम्यानच लक्षात आली असून तेव्हापासून अशा व्यक्तींना कोणताही लाभ वितरित करण्यात आलेला नाही.
या लाडक्या बहिणींनाच मिळणार ‘मे’ महिन्याचा हफ्ता यादीत नाव पाहा