ही सात ठरवतात तुमची जमिनीची मालकी हक्क
जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहार झाल्यानंतर संबंधित जमीन ही तुमच्या मालकीची आहे हे कायदेशीर रित्या सिद्ध करणारे काही कागदपत्राच्या स्वरूपातील पुरावे तुम्ही सांभाळून ठेवणे गरजेचे असते. त्यामध्ये साधारणपणे संबंधित व्यवहाराचे किंवा जमिनीचे खरेदीखत, त्या जमिनीचा सातबारा, खाते उतारा,
जमीन मोजणीचा नकाशा तसेच संबंधित जमीन महसुलाच्या पावत्या, या जमिनी संबंधीचे पूर्वीचे खटले व प्रॉपर्टी कार्ड इत्यादी बाबत सर्व कागदपत्रे सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. साधारणपणे तुम्ही एखादी मालमत्ता खरेदी कराल तेव्हा काही कागदपत्रांची तपासणी करणे गरजेचे असते व ती कागदपत्रे म्हणजे..
2- स्व अधिग्रहित मालमत्ता असेल तर जो काही जमीन विक्री करणारे व्यक्ती आहेत त्याचे जे काही कायदेशीर वारस आहेत त्यांना दस्तऐवजाची साक्ष देण्यास सांगावे म्हणजेच प्रतिज्ञापत्र किंवा कायदेशीर दृष्ट्या नोटरी सारखे कागदपत्र करून घेणे उत्तम असते.
3- यासोबतच पट्टा किंवा चित्ता यासारख्या महसूल नोंदीची पडताळणी करून घेणे गरजेचे आहे. संबंधित जमिनीच्या विक्रेत्याच्या नावाचे रजिस्ट्रेशन किंवा मालमत्ता कर पावत्या पाहून घेणे महत्त्वाचे ठरते.
4- तसेच संबंधित जमिनीची तहसील कार्यालय किंवा महसूल विभागाकडून पडताळणी करून घेणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जुन्या आणि नवीन सर्वे नंबरचा परस्पर संबंधासह मालमत्ता ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत ती आहे की नाही हे तपासून घेणे गरजेचे आहे.
5- तसेच तीस वर्षाकरिता भार प्रमाणपत्रासाठी अर्ज करून घ्यावा आणि भार प्रमाणपत्र यामध्ये मृत्युपत्र, गहाण, तारण आणि कायदेशीर संलग्न धारणाधिकार, शुल्क तसेच सरकारच्या माध्यमातून संपादन यासारखे कोणतेही इतर अधिकार किंवा बोजा आहे किंवा नाही हे एफेटिव्हेट म्हणजे सत्यापित करून घेणे गरजेचे आहे..
7- संबंधित मालमत्ता ही निवासी भूखंडाच्या स्वरूपामध्ये जर असेल तर तिचा लेआउट आहे की नाही हे देखील तपासून घ्यावे आणि जर लेआउट असेल तर मंजूर आहे की नाही हे देखील तपासावे. तसेच लेआउट तयार करण्यासाठी ज्या काही नियम व अटी म्हणजेच मानदंड असतात ते पूर्ण केले आहेत की नाही हे देखील तपासा. कारण बऱ्याचदा अशा जागा या सार्वजनिक हेतूसाठी आरक्षित देखील केलेल्या असू शकतात.
8- गिफ्ट डिड अमलात आणली गेली आहे की नाही आणि लेआउट मध्ये वाटप केलेली सामायिक क्षेत्र संबंधित पंचायत/ नगरपालिका इत्यादी कडे सुपूर्द केली आहे किंवा नाही हे स्थानिक प्रशासनाकडे तपासून घ्यावे.
कुठलीही मालमत्ता खरेदी करताना खालील गोष्टींची काळजी घ्या
1- मालमत्ता किंवा जमीन मालकाशी म्हणजे जे कायदेशीर दृष्ट्या व कागदपत्रानुसार मालमत्तेचे मालक आहेत त्यांची समक्ष भेट घेणे गरजेचे आहे.
2- यामध्ये महत्त्वाचे म्हणजे जर तुम्ही संबंधित जमीन किंवा प्रॉपर्टी खरेदी करताना बँकेकडून कर्ज घेत असाल तर तुम्हाला खूप काही सोपे होते. कारण बँक संबंधित मालमत्तेवर कर्ज देत असताना त्याची कायदेशीर आणि तांत्रिक प्रक्रिया तपासूनच कर्ज देते.
3- तसेच व्यवहार करताना त्या क्षेत्रातील प्रसिद्ध असे प्रॉपर्टी ॲडव्हायझर म्हणजेच मालमत्ता सल्लागारांचा सल्ला घेणे गरजेचे असते किंवा अशा व्यवहारांमध्ये त्यांचा समावेश करून घेणे कधीही चांगले. कधीही मालकाकडून थेट व्यवहार करू नये.
4- संबंधित जमीन किंवा मालमत्ता यांचे संपूर्ण कागदपत्रे तपासून घ्यावीत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जर तुम्हाला त्या मालमत्तेची कायदेशीर स्थिती काय आहे? हे तपासायचे असेल तर तुम्ही एखाद्या वकिलाची मदत घेतली तर खूपच उत्तम ठरते.
5- तुम्हाला जर संबंधित जमिनीच्या मालकी कोणाची आहे हे जर पाहायचे असेल तर तुम्ही विज बिल किंवा मालमत्ता कर यासारख्या कागदपत्रांचा आधार घेऊन मालकाचे नाव तपासू शकतात.
6- व्यवहार करताना जे काही तुम्ही पैसे म्हणजे देयक द्याल ते चेकच्या माध्यमातून आणि संबंधित मालमत्तेच्या कायदेशीर मालकाच्या नावाने करावीत. मालमत्तेचे मालक जर एकापेक्षा जास्त असतील तर मालमत्तेच्या कागदपत्रांमध्ये सर्व मालकांच्या नावाने समान धनादेश म्हणजेच चेक भरावा.
7- संबंधित मालकाकडून पैसे भरण्याची पावती घ्यावी.
8- खास करून अशा व्यवहारांमध्ये शाब्दिक वचन किंवा तोंडी काही व्यवहार करण्याऐवजी सर्व काही लेखी स्वरूपामध्ये असणे खूप गरजेचे आहे.
9- तसेच अशा हार्दिक शुभेच्छा व्यवहारांमध्ये साक्षीदारांनी स्वाक्षरी केले आहे की नाही हे तपासून पाहावे.
10- संबंधित मालमत्तेच्या मालकाची शेजारी किंवा इतर स्त्रोतांच्या माध्यमातून त्याची संपूर्ण माहिती व ट्रॅक रेकॉर्ड तपासून घेण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
अशा पद्धतीने तुम्ही जर या बाबींची काळजी घेतली तर जमीन खरेदी विक्री व्यवहारातील फसवणूक तुम्ही टाळू शकतात.