Lok Adalat Traffic Fine: लोकअदालतीत वाहनधारकांना मिळणार वाहनांच्या दंडात सवलत

traffic fine discount in Lok Adalat वाहतूक नियमभंगांचे प्रलंबित दंड जास्तीत जास्त सवलतीने भरण्याची संधी पुणेकरांना राष्ट्रीय लोकअदालतीत मिळणार आहे. 10 ते 13 सप्टेंबरदरम्यान येरवडा पोस्ट ऑफिसशेजारी वाहतूक शाखेच्या कार्यालयात सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत प्रलंबित दंड सवलतीच्या दरात भरून पुणेकरांना व इतर ठिकाणी इतरांना देखील थकबाकीमुक्त होता येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, पुण्यातील सर्व न्यायालयांमध्ये 13 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगांसाठी आकारलेल्या दंडात्मक ई-चलनाचे दावे तडजोडीतून निकाली काढण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

तुमच्या वाहनांवर किती दंड आहे? येथे तपासा

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या वतीने या लोकअदालतीत वाहतूक नियमभंगांच्या दंडांमध्ये तडजोडीने जास्तीत जास्त सवलत दिली जाणार आहे. राष्ट्रीय लोकअदालतीत नागरिकांना वाहतूक चलनांचा प्रलंबित दंड सुलभपणे भरून कायदेशीरपणे थकबाकीमुक्त होता येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी केले आहे.

यामध्ये मिळणार सवलत

विनाहेल्मेट दुचाकी चालविणे, सीटबेल्ट न लावता चारचाकी चालविणे, सिग्नल तोडणे, वेगमर्यादा ओलांडणे, चुकीचे पार्किंग, वाहन चालविताना मोबाईलचा वापर, विनापरवाना तसेच विना पीयूसी वाहन चालविणे, फिटनेस प्रमाणपत्र नसणे, चुकीच्या लेनमध्ये वाहन चालविणे, नंबरप्लेट नसणे आदीमध्ये वाहनधारकांना सवलत मिळणार आहे.

नीलेश वाघमोडे, जिल्हा व सत्र न्यायालयलोकअदालतीत दंडाच्या शुल्कात सवलत मिळावी, अशी मागणी वाहनचालकांची होती. यंदाच्या लोकअदालतीत त्यांना ती संधी मिळणार आहे. त्यामुळे, वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या उपक्रमातून नागरिकांना जास्तीत जास्त सवलतीत दंड भरून वाहतूक नियमभंगांची चलने तडजोडीने निकाली काढता येतील.

 

तुमच्या वाहनांवर किती दंड आहे? येथे तपासा

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!