LPG Gas cylinder price संदर्भात नवीन वर्षात मोठी आनंदवार्ता आली आहे. देशात जुलै महिन्यानंतर पहिल्यांदाच गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अर्थात घरगुती गॅसच्या आघाडीवर ग्राहकांना अगोदरच दिलासा मिळालेला आहे.
गेल्यावर्षी मार्च 2024 मध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत घसरण झाली होती. आता व्यावसायिक गॅसच्या किंमतीत मोठी घसरण आली आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस कंपन्या किंमती अपडेट करतात. आता या वर्षाच्या पहिल्या महिन्यात असा आहे भाव..
घरगुती गॅस सिलेंडरचा भाव काय?
व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत घसरण
5 महिन्यात इतका महागला सिलेंडर
गेल्या पाच महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत सातत्याने वाढ झाली. जुलै ते डिसेंबर या काळात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत दिल्लीमध्ये 172.5 रुपयांची दरवाढ नोंदवण्यात आली. तर कोलकत्ता आणि चेन्नईमध्ये 171 रुपयांनी भाव वधारला. मुंबईत 173 रुपयांनी भाव वाढले.
डिसेंबर महिन्यात सलग पाचव्यांदा दरवाढ झाली होती. 19 किलो एलपीजी सिलेंडरच्या किंमती 16.50 रुपयांनी वाढल्या होत्या. या दरवाढीनंतर देशातील चार प्रमुख शहरातील व्यावसायिकांना गॅस सिलेंडरसाठी जादा किंमत मोजावी लागली. त्यानुसार, दिल्लीत गॅस सिलेंडर 1818.50 रुपये, तर मुंबईत 1771 रुपये, कोलकत्तामध्ये 1927 रुपये आणि चेन्नईत 1980 रुपयांना गॅस सिलेंडरचा भाव झाला होता.
जिल्ह्यानिहाय लाईव्ह दर येथे पाहा