Magel tyala saur pump मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असा करा ऑनलाईन अर्ज मोबाईलद्वारे
परंतु तुम्हाला जर सीएससी सेंटरवर जायला जमत नसेल तर तुम्ही हा मागेल त्याला कृषी पंप योजनेचा अर्ज अगदी मोबाईलद्वारे देखील अगदी सोप्या पद्धतीने सादर करू शकता.
मोबाईलचा उपयोग करून तुम्ही जर शेतात असाल तर अगदी शेतातून तुम्ही या मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेवू शकता.
सौर कृषी पंपासाठी किती भरावे लागेल लाभार्थी हिस्सा
अर्जदार शेतकरी जर एससी किंवा एस टी प्रवर्गातील असेल तर अशा शेतकरी बांधवाना सौर पंपाच्या एकूण किमतीच्या ५ टक्के रक्कम लाभार्थी हिस्सा म्हणून भरावी लागणार आहे.
अर्जदार जर खुल्या प्रवर्गातील असेल तर मात्र पंपाच्या एकम किमतीच्या १० टक्के रक्कम शासनास भरावी लागणार आहे.
मोबाईलद्वारे देखील तुम्ही स्वतः अर्ज करता येईल मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठी शेतकऱ्यांना काही कागदपत्रे आवश्यक आहेत ते तुम्ही खालील प्रमाणे पाहू शकता.
तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवरून सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.
ऑनलाईन अर्ज लिंक येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे तुमच्याकडे तयार ठेवा.
आधार कार्ड.
बँक पासबुक.
पासपोर्ट फोटो.
सातबारा उतारा ज्यावर विहीर किंवा बोअर अर्जदाराच्या नावे नोंद असावी. magel tyala saur pump
संमती पत्र. विहिरी किंवा बोअर सामाईक असेल तर अशावेळी इतर शेतकऱ्यांची संमती असल्याचे संमतीपत्र
सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला डिजिटल सातबारा डाउनलोड करावा लागतो.
तुम्हाला देखील मागेल त्या सौर कृषी पंप योजना अंतर्गत सोलर पंप हवा असेल तर लगेच तुमच्या मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज सादर करून द्या.