Magel Tyala Solar: शेतकऱ्यांनी पेमेंट करूनही सोलर इन्स्टॉलेशन नाही, सोलर योजनेत चाललंय काय?

Solar Pump Yojana : गेल्या काही दिवसांपासून मागेल त्याला सोलार योजना बिकट अवस्थेत असल्याचं चित्र आहे.

Solar Pump Yojana :  शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून मागेल त्याला सौर पंप योजनेच्या (Magel Tyala Solar Yojana) अंतर्गत सोलर पंप दिले जात आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून ही योजना कार्यान्वित असून अनेक शेतकरी देखील यात सहभागी आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून ही योजना बिकट अवस्थेत असल्याचं चित्र आहे.

मागेल त्याला सोलर पंप योजना (Magel Tyala Solar) राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू असलेली योजना आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप वितरित करण्यात येतात. यासाठी राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी या सहभाग घेत सोलरसाठी अर्ज केला आहे. शिवाय अनेक शेतकऱ्यांनी या माध्यमातून पेमेंटही केले आहेत.

शेतकऱ्यांना सोलर पंप (Solar Pump Yojana) दिले जात नव्हते, ज्या शेतकऱ्यांनी वेंडर सिलेक्शन केलेले आहेत. त्यांचे सोलर पंप वेंडरच्या माध्यमातून लावले जात नव्हते, सोलर पंप लावत असताना वेंडरच्या माध्यमातून पैशांची मागणी केली जात होती, ज्यांचे सोलर पंप लागलेले आहेत. त्यांचे सोलर पंप नादुरुस्त आहेत, अशा अनेक बाबींमुळे शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेवर मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त करण्यात येत आहे.

जवळपास दहा ते साडेदहा लाख पंप हे शेतकऱ्यांना देण्याचा उद्दिष्ट घेण्यात आलेलं होतं. त्यामुळे अनेक शेतकरी शुल्क भरून पंपाच्या प्रतीक्षेत होते. शिवाय पीएम कुसुमचे अंतर्गत जे अर्ज भरले होते, त्या अर्जांना पूर्वी पेमेंटचे ऑप्शन देण्यात आलेले नव्हते. परंतु नंतर त्यांना पेमेंटचा पर्याय देऊन पुढच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सांगितलं जात होते. या योजनेचे अंतर्गत शेतकऱ्यांना पात्र करण्यात येत होते.

 

सौरपंप योजना शेतकरी यादीत नाव पाहा

 

प्रक्रिया राबवावी… दरम्यान या योजनेच्या माध्यमातून शेतकरी शुल्क भरणा करत आहेत, मात्र सोलर इन्स्टॉलेशनसाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचे चित्र आहे. अनेकदा जूनमध्ये इन्स्टॉलेशनच्या प्रक्रिया पार पाडल्या जातात. कारण पुढील तीनही महिने पावसाचे आणि शेतीच्या कामाचे असल्याने या काळात व्यवस्थित रित्या सोलर इन्स्टॉलेशन होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे लवकरात लवकर या योजनेची पुढील प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

प्रक्रिया सुरु होण्याची शक्यता दरम्यान 23 मे 2025 पासून या योजनेच्या अंमलबजावणीचा पुढचा टप्पा आता सुरू करण्यात आलेला आहे. यातील इन्स्टॉलेशन ची कामे आता पावसामुळे होणार नसली तरी या योजनेच्या अंतर्गत वेंडर सिलेक्शन असेल पुढची प्रक्रिया असतील. त्या करण्यासाठी शेतकऱ्यांना आता आवाहन करण्यात येत आहे.  शेतकऱ्यांनी अर्ज केले होते अशा शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने पात्र करून पेमेंट साठी सांगितलं जात होतं. त्या शेतकऱ्याला प्राधान्याने पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात येण्याची शक्यता आहे.

 

सौरपंप योजना शेतकरी यादीत नाव पाहा

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!