Maharashtra Weather Updates : राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून धोधो पाऊस पडत असून राज्यातील बहुतांश भागातील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. तर पीक विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतवाढ देण्यात आली असून ३१ जुलै पर्यंत पीक विमा भरता येणार आहे.

आज हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, आज कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तीन जिल्हे आणि विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. मागील दोन आठवड्याचा विचार केला तर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्याचा दिसून येत आहे.

पीक विमा भरण्यासाठी केंद्र सरकारने दिली मुदतवाढ आता मोबाईलवर भरा पीकविमा पहा संपूर्ण प्रक्रिया

कोणत्या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट?
कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील सातारा, विदर्भातील, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता असून येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

कोणत्या जिल्ह्यांसाठी अलर्ट?
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, बुलढाणा, जालना, परभणी, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असून या सर्व जिल्ह्यांत येलो अलर्ट देण्यात आला आहे.

दरम्यान, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, बीड, धाराशिव, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर आणि सांगली, यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे पण कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

पावसात फिरायला जाताय काळजी घ्या पहा हा व्हिडीओ Viral Video

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!