Maharashtra Rain Update : अतिजोरदार आजपासुन २५ ते २७ सप्टेंबर (बुधवार ते शुक्रवार) पर्यतच्या पुढील ३ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Rain Update) विजांच्या कडकडाट व मेघ गर्जनेसह जोरदार ते अति जोरदार परतीच्या पावसाची शक्यता आहे असे हवामान खात्याने सूचित केले आहे.

यामध्ये मराठवाडा व विदर्भात मात्र ही परिस्थिती रविवार दि. ३० सप्टेंबर पर्यंत टिकून राहण्याची शक्यता जाणवते असे देखील सांगण्यात आले आहे.

छत्तीस तास अतिजोरदार पावसाचे १६ जिल्हे –

Weather alert आज दि.२५ (बुधवार) ची रात्र व दि.२६ (गुरुवार) चा दिवस व रात्र असे ३६ तास रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, छ. सं.नगर, जालना, बीड अशा १६ जिल्ह्यात अंदाजे १२ ते २० सेमी. दरम्यानचा अति जोरदार किंवा काही ठिकाणी २० सेमी पेक्षाही अधिक अशा अत्याधिक जोरदार परतीच्या पावसाची शक्यता जाणवते. विशेषतः मध्य महाराष्ट्रातील पर्जन्यच्छायेतील प्रदेशात या परतीच्या पावसाचा जोर पुढील ३६ तासात अधिक जाणवेल.

पुरजन्य परिस्थिती
कोकणातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे व उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा ७ जिल्ह्यात तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा ६ जिल्ह्यात, यानुसार अशा एकूण १३ जिल्ह्यातील तापी, गोदावरी व कृष्णा नद्यांच्या खोऱ्यात येत्या तीन दिवसात पूर परिस्थिती जाणवू शकते, असे वाटते.

पावसाचा जोर कधी कमी होण्याची शक्यता
खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर अशा १० जिल्ह्यात शनिवार दि. २८ सप्टेंबरपासून पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता जाणवते. IMD चा इशारा

अधिक माहितीसाठी येथे पहा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!