Maharashtra Weather: पुढचे २४ तास हाय अलर्ट! या जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धुवाधार पाऊस पडला आहे. पुढचे २४ तास हे अत्यंत महत्त्वाचे सांगण्यात आले आहे. अनेक जिल्ह्यांना ऑरेंज आणि येलो अलर्ट देण्यात आला आहे.

त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आला आहे. मुंबईत पुढचे काही तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert)

राज्यात अनेक ठिकाणी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.आज रायगड आणि पुणे घाटात रेड अलर्ट सांगण्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे,पालघर, पुणे घाट, सातारा घाट,रत्नागिरी, छ.सुंभाजीनगर, बीड या जिल्ह्यांना आज ऑरेंज देण्यात आला आहे.

याचसोबत छत्रपती संभाजी नगर, पुणे घाट आणि रायगड या जिल्ह्यांना उद्यादेखील ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढच्या ४८ तासात या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये काल रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे.यामुळे आज सकाळी अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते. याचसोबत पावसाचा रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला होता. दरम्यान, आता मुंबईसह उपनगरात पावसाने उसंत घेतली आहे.

Maharashtra Mumbai Pune Weather Live Update : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसाचा जोर सोमवारी सकाळपासून चांगलाच वाढला. मुंबई, ठाणे, पनवेलसह पुणे, सातारा रायगड, बीडमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. हवामान विभागाकडून मुंबईमध्ये पुढील चार ते पाच तासांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. गरज नसेल तर घराबाहेर पडू नका, असा इशारा आयएमडीकडून देण्यात आला आहे. दुसरीकडे पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे घरात पाणी साचलेय. लोणी काळभोर परिसरात पावसाने रौद्ररूप घेतले. पुणे-सालापूर माहामार्ग लोणीमध्ये पाण्याखाली गेलाय. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

हवामान विभागाकडून मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. पुढील चार तास मुंबईमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईमध्ये सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. दादर, कुर्ला, प्रभादेवी, अंधेरीसह मुंबईत अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. तर रेल्वेही उशिराने धावत आहेत.

पुण्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा –

पुण्यात दोन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. सोमवारी पावसाचा जोर आणखी वाढला आहे. पुणे जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट दिलेला असून पुढील ३ तासांत जिल्ह्यांत मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात विजांसह वादळी वारे आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. १५ सप्टेंबर रोजी थेऊर येथील रुके वस्ती जिल्हा परिषद शाळा परिसरात पावसाच्या पाण्यात १५० नागरिक अडकले. स्थानिक मदतकार्याबरोबरच पीएमआरडीए व NDRF टीमने बचाव करून सुमारे ५५ नागरिकांना सुरक्षित हलविले. पाणी ओसरत असून सकाळपर्यंत उर्वरित नागरिक घरी परततील. कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण जन जीवन विस्कळीत झालेय. लोकांच्या घरात पाणी साचले आहे. पुणे-सोलापूर महामार्ग लोणीमध्ये पाण्याखाली गेला आहे.

आयएमडी मुंबईनुसार, पुणे, रायगड, अहमदनगर, बीड आणि लातूर येथे जोरदार वारे आणि गडगडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडीने या आठवड्यात महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, ’16 सप्टेंबर रोजी कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक/काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस/गडगडाटासह काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.’ तसेच, 15 आणि 16 सप्टेंबर रोजी कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अलर्ट म्हणजे काय?

रेड अलर्ट म्हणजे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रेड अलर्ट ही एक चेतावणी असते.

ऑरेंज अलर्ट म्हणजे सतर्कतेचा इशारा असतो. या ठिकाणी खूप जोरात पाऊस पडू शकतो.

येलो अलर्ट म्हणजे संततधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना लक्ष द्यावे.

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!