MANREGA scheme: वृक्ष, फळबाग लागवड, फुल पीक लागवड अनुदान योजना

नमस्कार मित्रांनो राज्यातील दारिद्र्याच्या उच्चाटनासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर वैयक्तिक लाभाच्या योजना कार्यक्रम लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड/ वृक्ष व फूलपिक लागवड कार्यक्रम (MANREGA Scheme) या अंतर्गत ठरवलेला आहे.

योजनेचे उद्दिष्ट
या योजनेअंतर्गत पुढील २५ वर्षे दरवर्षी सरासरी एक लक्ष हेक्टर फळझाड/ वृक्ष / फूलपिक लागवड होईल जेणेकरुन स्वातंत्र्याचे १०० वर्षे पूर्ण होतील तेव्हा या योजनेअंतर्गत एकूण २५ लक्ष हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली असेल असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

MANREGA Scheme योजनेचा फायदा
सन १९९० -९१ मध्ये राज्यात प्रथमतः रोजगार हमी योजनेद्वारे फळबाग लागवड योजना (MANREGA Scheme) राबविण्यात आली आहे. सदर योजनेमुळे राज्यात फळबाग पिकाखाली क्षेत्र वाढण्यास मदत झाली व योजनेस शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

फळपिकाचे उत्पादन वाढीसाठी सूक्ष्म सिंचनाचा वापर तसेच व्यावसायिक पद्धतीने फळबागांचे नियोजन केल्यामुळे उत्पादनात वाढ होऊन निर्यातीस चालना मिळण्यास मदत झाली. त्यामुळे आजच्या घटकेला महाराष्ट्र राज्य फलोत्पादन पिकाचे उत्पादन व निर्यातीमध्ये अग्रेसर आहे.

शेतकऱ्यांचा विविध नविन फळ / फुलपिकांची सलग जमिनीमध्ये तसेच बांधावर व पडीक जमिनीमध्ये लागवड करण्याकडे कल वाढत आहे. इतर राज्ये ही नवनवीन फळपिकांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये समावेश करून शेतकऱ्यांना फळबाग लागवड करण्यासाठी MANREGA Scheme मदत करीत आहेत.

ही सस्तुस्थिती लक्षत घेता राज्यात फळबाग योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून तसेच भविष्यात फलोत्पादन पिकास असलेला वाव लक्षात घेऊन नवीन फळपिके व फुलपिके यांचा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना MANREGA Scheme समावेश करण्यात येत आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभार्थ्याच्या शेताच्या बांधावर व शेतक-यांच्या शेतजमीनीवर वन विभागाच्या सामाजिक वनीवरण शाखेमार्फत वृक्ष लागवड कार्यक्रम ही राबविण्यात येत आहे.

महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, १९७७ (दिनांक ६ ऑगस्ट, २०१४ पर्यंत सुधारित) मधील अनुसूची दोन मधील परिछेद ४ मध्ये नमुद करण्यात आल्याप्रमाणे वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर, शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर फळझाड व फूलपिक लागवड कार्यक्रम ग्राम पंचायती तसेच कृषी व फलोत्पादन विभागामार्फत आणि वृक्ष लागवड कार्यक्रम वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत ही योजना राबवली जात आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!