Crop Insurance News : जिल्ह्यांतील ८५०१ गावांची पैसेवारी ५०च्या आत यादी पहा मराठवाड्यातील ८५०१ गावांची सुधारित पैसेवारी ४७ पॉइंट ४२ पैसे इतकी आली आहे. एकीकडे पैसेवारी ५० पैशांच्या आत आली असताना मराठवाड्यातील ७६ पैकी केवळ १४ तालुक्यांत शासनाला दिसलेला गंभीर दुष्काळ ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत.

साधारणपणे ३० सप्टेंबरला हंगामी, ३० ऑक्टोबरला सुधारित व १५ डिसेंबरला अंतिम पैसेवारी शासनाकडून जाहीर करण्यात येते. त्यानुसार ३० सप्टेंबरला मराठवाड्यातील ८४९६ गावांपैकी ४५८४ गावांची हंगामी पैसेवारी ५० पैशाच्या आत, तर ३९१२ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या पुढे आली होती.

पावसाचे प्रदीर्घ खंड, पिकांची दयनीय अवस्था, जमिनीत ओल नसल्याने अपेक्षित रब्बी पेरणीची धूसर बनलेली आशा या सर्व पार्श्‍वभूमीवर शासनाकडून जाहीर करण्यात येणारी सुधारित पीक पैसेवारी किती येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. ३० ऑक्टोबरला महसूल प्रशासनाकडून मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५०१ गावांतील सरासरी पीक पैसेवारी ४७.४२ पैसे इतकी आली आहे.

 

मराठवाड्यातील ८५०१ गावांची सुधारित पैसेवारी जाहीर यादी येथे पहा

 

जिल्हानिहाय सुधारित पीक पैसेवारीनुसार छत्रपती संभाजीनगरमधील १३५६ गावातील सरासरी पीक पैसेवारी ४५.५९ पैसे, धाराशिवमधील ७१९ गावांची ४७.७३ पैसे, बीडमधील १४०२ गावांची ४६.९१ पैसे, परभणीमधील ८३२ गावांची ४७.६८ पैसे, नांदेडमधील १५६२ गावांची ४७.८७ पैसे, जालन्यातील ९७१ गावांची ४७.३५ पैसे, लातूरमधील ९५२ गावांची ४७ पैसे, तर हिंगोलीतील ७०७ गावांची ४९.२० पैसे इतकी पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १९ गावांचा समावेश हा मनपा हद्दीत असल्याने त्या गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. पैठण तालुक्यातील १९७ गावांपैकी ६ गावे जायकवाडी प्रकल्पात संपादित झाली आहेत. गंगापूर तालुक्यातील एकूण २२४ महसुली गावांपैकी २ गावे जायकवाडी प्रकल्पात संपादित झाली आहेत. फुलंब्री तालुक्यातील ९३ गावांपैकी २ गावे बेचिराख असल्याने त्या गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही.

धाराशिव जिल्ह्यातील ३६१ गावे रब्बी पेरणीची आहेत. त्यामध्ये धाराशिवमधील ६७, तुळजापूरमधील ४०, उमरगेतील २१, लोहारामधील १०, कळंबमधील १९, भूममधील ९०, वाशीमधील २३, परंडामधील ९१, रब्बी गावातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त पेरणी खरीप हंगामात झालेली आहे.

त्या गावाची पैसेवारी खरीप हंगामात जाहीर करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील एकूण १४०२ गावांपैकी माजलगाव तालुक्यातील १२१ गावांपैकी ५ गावे पूर्णतः माजलगाव धरणामध्ये बुडित आहेत.

नांदेड तालुक्यातील १३ गावांचा समावेश नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेमध्ये झाल्यामुळे त्या गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली नाही. परतूर तालुक्यातील ९८ गावांपैकी राणीवाहेगाव हे गाव बुडित क्षेत्रात असल्यामुळे केवळ ९७ गावांची पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!