Government scheme राज्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत व्यक्तिगत सिंचन विहिरींसाठी पूर्वी चार लाख एवढे अनुदान देण्यात येत होते.
अनुदानाच्या आर्थिक मर्यादेत चार लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली होती. मागील तीन वर्षांत (२०२१-२२ ते जून २०२४ पर्यंत) २९ हजार ४९० इतक्या सिंचन विहिरींची कामे पूर्ण झालेली असून, एक लाख ५५ हजार १६४ इतक्या सिंचन विहिरींची कामे प्रगतिपथावर आहेत.
सध्याची चार लाख मर्यादा
शासन निर्णय पाहा
नवा मजुरी दर २९७ रुपये
१ एप्रिल २०२४ पासून केंद्र सरकारने मनरेगांतर्गत मजुरी दरामध्ये वाढ करून तो आता २९७ रुपये इतका अधिसूचित केलेला आहे. मजुरी दराच्या ४० टक्के इतका कुशल खर्च हा जवळपास १९८ रुपये इतका अनुज्ञेय आहे. म्हणजेच प्रतिमनुष्य दिवस जवळपास महत्तम ५०० रुपये अकुशल व कुशल म्हणून रक्कम अनुज्ञेय करता येऊ शकते.
या बाबी लक्षात घेता ९०० मनुष्य दिवसासाठी चार लाख ५० हजार रुपये इतका खर्च अपेक्षित असून, याशिवाय विहीर कामांमध्ये पाणी उपसणे व इतर आनुषंगिक बाबींसाठी जवळपास ५० हजार रुपये इतकी तरतूद करण्यात आली आहे.
सुधारित मर्यादा
बांधकाम विभागाच्या चालू दरसूचीनुसार व केंद्र सरकारच्या १ एप्रिल २०२४ पासून मनरेगांतर्गत लागू झालेले मजुरी दर रक्कम २९७ रुपये प्रतिदिन विचारात घेऊन, सिंचन विहिरीच्या बांधकामाची सुधारित अंदाजित रक्कम चार लाख ९९ हजार ४०३ रुपये एवढे अनुदान देण्यात येणार आहे. सिंचन विहीर अनुदान रकमेची कमाल महत्तम मर्यादा रुपये पाच लाख रुपये करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.