तो माणूस नाही पण…श्वानाच्या पिल्लाला सुखरूप पोहचवण्यासाठी माकडाची तारेवरची कसरत; पाहा VIDEO

Viral Video : जंगलात राहणारे माकड बहुतांश वेळा कळपात फिरत असते. कधीकधी ही माकडे मानवी वस्तीतही येतात.

Video Shows Monkey Helps Little Puppyजंगलात राहणारे माकड बहुतांश वेळा कळपात फिरत असते. कधीकधी ही माकडे मानवी वस्तीतही येतात. ते जेव्हा एकत्र असतात, तेव्हा कुणीही त्यांच्याशी पंगा घ्यायला जात नाही. अगदी जवळजवळ सगळे आपल्याजवळ असणारा मोबाइल, खाण्याच्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या बॅगेत ठेवून देतात. कारण माकड नेहमीच खाण्यापिण्याच्या वस्तूंपासून अगदी मोबाइलसुद्धा आपल्या हातातून हिसकावून घेतात. तर ही माकडे नेहमीच आपल्याला त्रास देतात का? तर आजचा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही नाही असे म्हणाल.

व्हायरल व्हिडीओत एका झाडावर माकड चढलेले दिसते आहे आणि त्याच्या हातात श्वानाचे पिल्लूसुद्धा आहे. या झाडाच्या शेजारी बिल्डिंगमधील एका रूमची बाल्कनीसुद्धा आहे. पण, हे श्वानाचे पिल्लू या माकडाला कसे भेटले याची कोणतीही माहिती अद्याप कळू शकलेली नाही. पण, माकडाने श्वानाच्या पिल्लाला आपल्या पिल्लाप्रमाणे जवळ घेऊन झाडावर बसले आहे. माकड श्वानाच्या पिल्लाबरोबर नेमके काय करते, तो त्याला कसे झाडावरून खाली उतरवतो ते व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा.

 

संपूर्ण व्हिडीओ येथे पाहा

 

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, माकड श्वानाच्या पिल्लाला आपल्या पिल्लाप्रमाणे अगदी घट्ट पकडून या झाडावरून त्या झाडावर जाण्याचा प्रयत्न करत आहे. श्वानाच्या पिल्लाला झाडावरून खाली नेण्यासाठी माकडाची धडपड सुरू आहे. अखेर तो एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडी मारत, कुठेही श्वानाच्या पिल्लाला इजा न पोहचवता सुखरूप खाली घेऊन येतो आणि खाली उतरताच त्याला जमिनीवरसुद्धा ठेवतो, जे पाहून तुम्हाला कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.

 

व्हिडीओ नक्की बघा..

 

 

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, माकड श्वानाच्या पिल्लाला आपल्या पिल्लाप्रमाणे अगदी घट्ट पकडून या झाडावरून त्या झाडावर जाण्याचा प्रयत्न करत आहे. श्वानाच्या पिल्लाला झाडावरून खाली नेण्यासाठी माकडाची धडपड सुरू आहे.

 

“इस प्यार को क्या नाम दु” कुत्रा आणि माकडाचे प्रेम video viral

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!