MSP Price for Crops : मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे दिवाळी गिफ्ट; ‘या’ पिकांच्या ‘एमएसपी’मध्ये केली वाढ

मोदी सरकारच्या कॅबिनेट मिटींगमध्ये शेतकऱ्यांना मोठे दिवळी गिफ्ट देण्यात आले आहे. केंद्र सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी) मध्ये वाढ केली आहे.

 

यामध्ये गहू पिकाला देण्यात येणाऱ्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल १५० रुपये तर, मोहरीसाठी ३०० रुपये प्रति क्विंटलची वाढ करण्यात आली आहे.

या पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ

रिपोर्टनुसार मार्केटिंग सीझन २०२५ -२६ साठी सरकारने रब्बी पिकांसाठी नवी एमएसपी निश्चित केली आहे. याअंतर्गत गव्हासाठीची एमएसपी १५० रुपये प्रति क्विंटलने वाढवून २,४२५ रुपेय करण्यात आली आहे, जी आधी २,२७५ रुपये प्रति क्विंटल होती. मोहरी पिकाची एमएसपी ३०० रुपये प्रति क्विंटलने वाढवून ती ५,६५० रुपये प्रति क्विंटलहून वाढून ५,९५० रुपये प्रति क्विंटल झाली आहे.

यासोबतच हपभऱ्याची एमएसपी २१० रुपये प्रति क्विटल इतकी वाढवण्यात आली आहे,ज्यामुळे त्याची नवीन एमएसपी ५,६५० रुपये प्रति क्विंटल झाली आहे, जी यापूर्वी ५४४० रुपये प्रति क्विटल इतकी होती.

मसूरची एमएसपी २७५ रुपये प्रति क्विंटलने वाढवण्यात आली आहे ती आता ६,४२५ रुपयांहून वाढून ६,७०० रुपये प्रति क्विंटल झाली आहे. तर करडईच्या एमएसपीमध्ये १४० रुपये वाढवण्यात आले आहेत ज्यामुळे त्याची खिंमत ५,८०० रुपयांनी वाढून ५,९४० रुपये करण्यात आली आहे.

एमएसपी काय असते?

एमएसपी म्हणजेच किमान आधारभूत किंमत ती असते जी सरकार शेतकऱ्यांच्या धान्यासाठी निश्चित करते. सोप्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास सरकार ज्या किंमतीला शेतकऱ्यांकडून त्यांचे धान्य विकत घेते त्याला एमएसपी म्हणतात. याचा उद्देश धान्यांची किंमत कमी जास्त झाली तरी शेतकऱ्यांचे नुकसान न होऊ देणे हा असतो.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!