Mu khyamantri Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. लाभार्थी गेल्या काही दिवसापासून जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत, जानेवारी महिन्यातील हप्ता कधी येणार याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी तारीख जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण याजनेचे पैसे २६ जानेवारी २०२५ रोजी जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
आज माध्यामांसोबत बोलत असताना मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत तारीख जाहीर केली आहे. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, २६ जानेवारीच्या आधी जानेवारी महिन्याचा लाभ मिळेल, असा आमचा प्रयत्न सुरू आहे. या महिन्यासाठी आम्हाला ३,६९० कोटी रुपये निधी मिळणार आहे. यासाठी आर्थिक नियोजन सुरू आहे. २६ तारखेच्या तीन ते चार दिवसात लाभ जमा होईल, असंही तटकरे म्हणाल्या. aditi tatkare
“२६ जानेवारीच्या आत वितरणाची सुरुवात आम्ही करत आहोत. या महिन्याचा १५०० चा लाभ मिळणार आहे, असंही तटकरे म्हणाल्या. विरोधक याआधीपासूनच या योजनेविरोधात आरोप केले होते, पण निवडणुकीवेळी त्यांच्या घोषणा पत्रात त्यांनीही योजना अशीच दिली होती, असा टोलाही तटकरे यांनी लगावला. आम्ही आमच्या घोषणा पत्रात दिलेल्या सर्व योजना लोकांना देत आहोत. आता आम्ही फेब्रुवारी महिन्याचीही तयारी करत आहोत, असंही तटकरे म्हणाल्या.
“अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रत्येक महिन्यात खंड पडणार नाही, याची आम्ही काळजी घेणार आहोत. डिसेंबर महिन्यात आम्ही २ कोटी ४७ लाख लाभार्थ्यांना लाभ दिला होता, असंही तटकरे म्हणाल्या.
Post navigation