New Pan Card: केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमाअंर्गत देशातील नागरिकांना लवकरच QR कोड सुविधेसह नवीन पॅनकार्ड मिळणार आहे. केंद्र सरकारने आयकर विभागाच्या पॅन 2.0 प्रकल्पाची घोषणा केली आहे.
पॅन 2.0 प्रकल्प काय आहे? (What is Pan 2.0)
पॅन 2.0 प्रकल्पाबाबत बोलताना सोमवारी रात्री केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “हे एकात्मिक पोर्टल असेल. ते पूर्णपणे पेपरलेस आणि ऑनलाइन असेल. तक्रार निवारण प्रणालीवर भर दिला जाईल.”
माझ्याकडे जुने पॅनकार्ड आहे, मला पुन्हा नवीन पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल का?
जुन्या पॅनकार्डचे काय होणार?
अनेकांच्या मनात असा प्रश्न आहे की, नवीन पॅनकार्ड मिळाल्यानंतर ज्यांच्याकडे जुने पॅनकार्ड त्यांचे काय होईल? याचे उत्तर म्हणजे, तुमचा नंबर तसाच राहील. मात्र तुम्हाला नवीन पॅनकार्ड मिळेल. यानंतर जुने पॅनकार्ड कचऱ्यात जमा होईल.
नवीन पॅन कार्डमध्ये कोणती वैशिष्ट्ये असतील? (New Pan Card Features )
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन पॅनकार्डमध्ये क्यूआर कोड आणि इतर अनेक वैशिष्ट्ये असतील. ज्यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
पॅनकार्ड काढा आता ऑनलाईन आपल्या मोबाईलवर
नवीन पॅन कार्ड अपग्रेडेशनसाठी पैसे द्यावे लागतील का? (Cost for New Pan Card)
अश्विनी वैष्णव यांच्या मते, ‘पॅन कार्डचे अपग्रेडेशन मोफत असेल. यासाठी पॅनकार्डधारकाला कोणतीही रक्कम द्यावी लागणार नाही. म्हणजेच नवीन पॅन कार्ड तुम्हाला मोफत दिले जाईल.
नवीन पॅन कार्डमधील डेटा सुरक्षित असेल का? (is New Pan Card Data Safe?)
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव वैष्णव यांच्या मते, ‘अपग्रेड केलेल्या पॅन कार्डमधील डेटा पूर्णपणे सुरक्षित असेल. यासाठी पॅन डेटा व्हॉल्ट प्रणाली बनवली जात आहे.’
पॅन कार्ड म्हणजे काय? (What is Pan)
पॅन किंवा परमनंट अकाउंट नंबर हे दहा अंकी ओळखपत्र आहे. प्राप्तिकर विभाग ते प्लास्टिक कार्डच्या स्वरूपात जारी करते. याचा बॅंकिंग कामासाठी उपयोग केला जातो.