Pashupalan शेतीला जाेडधंदा म्हणून पशुपालन शेळी-मेंढी पालन करताय? ५०लाख अनुदानावर या योजना देतात लाभ करा अर्ज
किती मिळते अनुदान? कसा कराल कर्ज? जाणून घ्या
कुक्कुटपालनाचा ५० लाखांपर्यंत प्रकल्प
एक हजार मांसल पक्षी, दोन शेड, अंडी उबवण यंत्र, असा ५० लाखांपर्यंतचा प्रकल्प उभारण्याची संधी आहे. यातही ५० टक्के अनुदान व १० टक्के स्वहिस्सा लागेल.
इथे वाचा सविस्तर: १००० अंड्यावरील कोंबड्यांसाठी २५ लाख रुपये अनुदान
शेळी गटासाठी १ कोटीपर्यंतची योजना
१०० शेळ्या व पाच बोकड, असा गट तयार करण्यासाठी २० लाखांपर्यंतचा प्रकल्प उभारता येणार आहे. स्वहिस्सा व अनुदान वगळता इतर रकमेचा कर्ज प्रस्ताव करावा लागणार आहे. यात शेड व चारानिर्मितीची व्यवस्थाही करावी लागणार आहे. २०० शेळ्या, १० बोकडसाठी ४० लाखांचा प्रकल्प असेल. या पटीत एक कोटी रुपयांपर्यंतच्या प्रकल्पाला शासन अनुदान देणार आहे.
पशू चारानिर्मितीलाही चालना
अलीकडे पशुधनासाठी लागणारा चारा मिळत नसल्याची मोठी अडचण समोर येत आहे. यासाठी मुरघास व टीएमआर निर्मितीचा प्रकल्प उभारल्यास ५० लाखांपर्यंतचा प्रकल्प घेता येणार आहे. यात ५० टक्के अनुदान व १० टक्के स्वहिस्सा लागेल. यात एक गोदाम, मशिन, चारानिर्मितीसाठी आवश्यक जमिनीची गरज राहणार आहे.
वराहपालनासाठी मिळते ३० लाखांपर्यंत अनुदान
रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, प्रती पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, पशुची उत्पादकता वाढवणे आहे. कुक्कुट, शेळी मेंढी व वराह पालनातुन प्रजाती विकासाद्वारे उद्योजकता विकास तसेच पशुखाद्य व वैरण उद्योजकता विकास यासाठी अर्ज करु शकतात.
ऑनलाइन अर्ज करा
या योजनेच्या लाभासाठी www.udyamimitra.gov.in या पोर्टलवर थेट ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. जर शेतकऱ्यांना यात अडचण येत असल्यास त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात संपर्क साधून पशुसं वर्धन विभागाची मदत घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुबोध नंदागवळी यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा