मुंबई : महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आज अर्थसंकल्पीय बजेट मांडण्यात आलं. या बजेटमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिंदे सरकारकडून अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.
महिलांसाठी देखील भरपूर घोषणा करण्यात आला आहेत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो पेट्रोल डिझेलचा आहे याबाबतही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.
तसेच पेट्रोलचा सध्याचा कर २६ टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैशांवरुन 25 टक्के अधिक प्रति लिटर पाच रुपये बारा पैसे करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे राज्यात पेट्रोल डिझेल एक दीड रुपयाने स्वस्त होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बजेटमध्ये केलेल्या घोषणेनुसार पेट्रोल डिझेलचे दर 65 पैशांनी स्वस्त होणार आहेत.
पेट्रोल डिझेल लाईव्ह दर येथे पहा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पात पाच केंद्रीय सशस्त्र दलातील जवानांना व्यवसाय करातून सुट दिली आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील आसाम रायफल्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस दल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक व सशस्त्र सीमा दल यातील राष्ट्रीय कर्तव्य बजावणाऱ्या सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट दिली आहे. याचा लाभ अंदाजे बारा हजार जवानांना होईल.
पप्पा की परी स्कुटी घेऊन थेट घुसली मेडिकल दुकानात video viral