येत्या दोन दिवसात या जिल्ह्यातील 90 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिकविमा होणार जमा पहा यादी
शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या परंतु अद्यापही पीक विमा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना २०२२ सालच्या खरीप पीक विम्यासाठी हिरवा कंदील देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीची आवश्यक ती भरपाई मिळावी यासाठी शासनाने निधी मंजूर केलेले होते. परिस्थितीची निकड पाहता शेतकऱ्यांना ऑक्टोबरपर्यंत नुकसान भरपाई वितरित करणे आवश्यक होते. kharip crop
बीड जिल्ह्यातील ४७ मंडळातील शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात आला, मात्र केवळ २७ मंडळांनाच पीकविमा मिळू शकला. उर्वरित १९ मंडळांना पीक विमा वाटपाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे, ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी तो मिळू शकला नव्हता, ते आता यासाठी पात्र ठरणार आहेत.
बीड जिल्ह्यातील ९०,००० शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात येणार असून एकूण ४७ मंडळांपैकी १९ मंडळांमध्ये विम्याचे वितरण सुरू झाले आहे. सुरुवातीला केवळ २८ मंडळांमध्ये राहणार्या शेतकर्यांनाच पीक विमा मिळेल, असे सांगण्यात आले होते, परंतु आता याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीला पत्र पाठवून आवश्यक ती पावले उचलली आहेत.
यानंतर, बजाज अलियान्झ कंपनीने सखोल पंचनामा करण्यासाठी कार्यवाही केली आणि त्यानंतर उर्वरित १९ मंडळातील शेतकर्यांना पीक विमा भरपाईचे वितरण सुरू झाले आहे.