महाराष्ट्रातील 92.89 लाख शेतकऱ्यांना मिळणार पैसे
कृषी विभागाच्या माहितीनुसार, राज्यातील 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना 19 व्या हप्त्यांतर्गत एकूण 1,967 कोटींचे वाटप केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश कृषी विभागाकडून देण्यात आले आहेत, जेणेकरून हप्ता त्यांच्या खात्यात वेळेत जमा होईल.
मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री ऑनलाईन सहभागी होणार
या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषिमंत्री माणिकराव कोकाटे नागपूरहून व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहेत.याशिवाय कृषी विभाग,महसूल विभाग, वन विभाग, ग्रामविकास विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्र आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधीही उपस्थित राहतील.
यादीत नाव पाहा
योजनेची वैशिष्ट्ये
या शेतकऱ्यांना मिळणार 3000 पेन्शन यादीत नाव पाहा
यापूर्वीचा हप्ता कुठे वितरित झाला होता?
18 वा हप्ता वाशिममधील शेतकरी मेळाव्यात वितरित करण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण देशभरातील 9.4 कोटी शेतकऱ्यांना तब्बल 20,000 कोटींची मदत त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. महाराष्ट्रातील 91,000 शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला होता.
शेतकऱ्यांनी हप्ता कसा तपासावा?
PM किसान योजनेचा हप्ता मिळालाय की नाही, हे जाणून घेण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:
pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
होमपेजवरील ‘Farmer Corner’ वर क्लिक करा.
‘Beneficiary Status’ पर्याय निवडा.
रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार क्रमांक टाका.
कॅप्चा कोड टाका आणि ‘Get OTP’ वर क्लिक करा.
रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर आलेला OTP टाका आणि सबमिट करा.
तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला आहे की नाही, याचा तपशील पाहता येईल.
हप्ता वाढणार का? सरकारचा काय निर्णय?
काही शेतकरी पीएम किसान योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवण्याची मागणी करत आहेत.मात्र,केंद्र सरकारने सध्या त्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तसेच, पीएम किसान आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतील रक्कम एकत्र जमा केली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.