PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, PM किसान सन्मान निधाचा 13 वा हप्ता? ‘या’ तारखेला मिळणार.
PM Kisan Yojana Update :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.
आत्तापर्यंत 12 हप्ते शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात जमा झाले आहेत. लवकरच 13 व्या हप्त्याची मदत देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे. नवीन वर्षात ही आर्थिक मदत कधी मिळणार? याबाबत चर्चा सुरु आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी त्याआधीच आपली eKYC तसेच रेशन कार्डहीत आपली सर्व कागदपत्रे अपडेट करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार 13वा हफ्ता येथे पहा यादी 

👉👉यावर क्लिक करा

या तारखेला शेतकऱ्यांना मिळणार 13 हप्ता
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिन्याला शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची मदत जमा होते. तीन हप्त्यांमध्ये हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 12 हप्ते मिळाले असून लवकरच 13वा हप्ताही बँकेत वर्ग होणार आहे. यापूर्वी, 17 ऑक्टोबर 2022 रोजी 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. आता 13 वा हप्ता देखील लवकरच शेतकऱ्यांना मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीचा 13 वा हप्ता डिसेंबर 2022 ते मार्च 2023 दरम्यान हस्तांतरित केला जाणार आहे. दरवर्षी चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये वर्ग केले जातात. आता पुढच्या 13 व्या हप्त्याचे पैसे 27 फेब्रुवारीपर्यंत हस्तांतरित केले जाऊ शकतात.

या शेतकऱ्यांना मिळणार 13वा हफ्ता येथे यादी पहा

👉👉यावर क्लिक करा

शेतकऱ्यांनी eKYC आणि रेशन कार्ड क्रमांक अपडेट करावेत
नवीन वर्ष सुरु होण्यापूर्वी 15 ते 20 डिसेंबर दरम्यान शेतकऱ्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं अद्याप 13 व्या हप्त्याबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत ज्यावेळी 11 वा हप्ता जमी झाला होता. त्यावेळी अनेक ठिकाणी फसवणुकीची प्रकरणं समोर आली होती. अनेक मृत शेतकरी, अपात्र शेतकरी, सरकारी कर्मचारी, श्रीमंत कुटुंबातील लोक यांच्या खात्यावर देखील पंतप्रधान किसान योजनेचे पैसे जमा झाले होते. त्यानंतर सरकारने ई-केवायसी, जमीन रेकॉर्ड पडताळणी आणि आता शिधापत्रिका क्रमांक सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, 13 वा हप्ता जमा हण्यापूर्वीचं शेतकऱ्यांनी आपली eKYC तसेच रेशन कार्ड क्रमांक लवकरात लवकर अपडेट करावेत असे सांगण्यात आले आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार 13वा हफ्ता येथे पहा यादी 

👉👉यावर क्लिक करा

हेही वाचा: PM Kisan Yojana : आता केवळ आधार द्वारे तपासले जाणार नाही PM किसान योजनेचे स्टेटस, सरकारने केला मोठा बदल

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!