Pik Vima: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! राज्यात प्रधानमंत्री पीक विमा अग्रीम रकमेचे वाटप सुरू
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील विम्याच्या अग्रीम रक्कमचे वाटप सुरू झालं आहे, अशी माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 1 कोटी 70 लाख 67 हजार अर्जदारांनी नोंदणी केली असून केवळ 1 रुपयात राज्य शासनाने शेतकऱ्यांना पीक विमा दिला आहे. यासाठी एकूण 8 हजार 16 कोटी रुपये विमा हप्ता द्यावा लागणार असून 3 हजार 50 कोटी 19 लाख रुपये असा पहिला हप्ता देण्यात आला आहे. (Latest Marathi News)
पर्जन्यमान आणि पीक पेरणी :
राज्यात 31 ऑक्टोबर अखेरपर्यंत सरासरीच्या 86 टक्के पाऊस (928.8 मि.मी.) झाला आहे. रब्बीसाठी 58 लाख 76 हजार हेक्टर पेरणीचे नियोजन असून आत्तापर्यंत 28 टक्के पेरणी झाली आहे. सध्या जमिनीतील ओलावा कमी झाल्याने पेरणी मंदावली आहे.