Ration Card: सामान्य नागरिकांना गोरगरीब, श्रमिक, गरजूंना माफक दरात अन्नधान्य देण्यासाठी साधारण रेशन कार्ड दिले जाते. आपल्याकडे रेशन कार्डचे अनेक प्रकार आहेत. राज्य सरकारतर्फे नागरिकांचे वेगवेगळ्या गटांत वर्गीकरण करून त्या-त्या गटानुसार त्यांना वेगवेगळे रेशन कार्ड दिले जाते.
रेशन कार्डचे दोन प्रमुख प्रकार
केशरी रेशन कार्ड
हे ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न पंधरा हजार ते एक लाखापर्यंत आहे, त्यांनाच दिले जाते. ज्यांचे स्थिर उत्पन्न नाही किंवा अत्यल्प उत्पन्न आहे, त्यांना हे कार्ड दिले जाते. बेरोजगार लोक, महिला आणि वृद्ध या वर्गात मोडतात. हे कार्डधारक प्रत्येक कुटुंब दरमहा ३५ किलो अन्नधान्य घेण्यास पात्र आहे. त्यांना तांदळासाठी प्रतिकिलो तीन रुपये, गव्हासाठी दोन रुपये अनुदानित दराने अन्नधान्य मिळते.
पांढरे रेशन कार्ड
याशिवाय ज्यांचे उत्पन्न अधिक आहे किंवा ते शासकीय कर्मचारी म्हणजे त्यांचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त आहे त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते.
रेशन कार्डचे फायदे
Ration Card List सर्व गावातील राशन यादी जाहीर अशी पहा ऑनलाईन
कार्ड तयार करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक
रेशन कार्ड काढण्यासाठी सेतू सुविधा केंद्रात उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला (सातबारा उतारा, वीजबिल), आधार कार्ड (कुटुंबातील सर्वांचे), १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र व चलन भरणे आवश्यक आहे. याशिवाय शिधापत्रिका काढण्यासाठी, तुम्हाला जवळच्या ऑनलाइन सुविधा केंद्रात, आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन किंवा घरबसल्या www.rcms.mahafood.gov.in या वेबसाइटद्वारे अर्ज करता येतो. अर्ज करताना त्यासाठी लागणारी सर्व कागदपत्रे जोडावीत. त्यानंतर संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांकडे जाऊन एकदा फोटो व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागते.पुरवठा विभागाकडून दारिद्र्य रेषेखालील लाभार्थींना पिवळे रेशन कार्ड, ज्यांचे उत्पन्न १ लाखापर्यंत आहे त्यांना केशरी रंगाचे, तर १ लाखाहून अधिक उत्पन्न ज्यांचे आहे त्यांना पांढऱ्या रंगाचे रेशन कार्ड दिले जाते.अंत्योदय योजनेतील लाभार्थींना प्रति कार्डावर महिन्याला २० किलो तांदूळ व १५ किलो गहू असे ३५ किलो मोफत धान्य मिळते.