RTE admission : नुकतीच आरटीई प्रवेश प्रक्रिया पहिली पात्र यादी 5 एप्रिल 2023 रोजी लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची नावं जाहीर झाल्यानंतर 12 एप्रिल 2023 रोजी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. तसेच निवड यादीतील पात्र विद्यार्थ्यांच्या पालकांना मोबाईलवर एसएमएस देखील प्राप्त झाला आहे.

परंतु पालकांनी फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टल वरील यादी व आपल्या अर्जाचे स्टेटस पाहावे. अर्जाची स्थिती या टॅब वर आपला अर्ज क्रमांक टाकून लॉटरी लागली अथवा नाही याची खात्री करावी.

महाराष्ट्रात आरटीई अंतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठी अर्ज करण्यात आले होते. यासाठी अर्ज भरण्याची ऑनलाईन प्रक्रिया rte25admission.maharashtra.gov.in वर पार पडली. आता निवड यादीतील प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्र तपासण्याची मुदत 13 एप्रिल 2023 पासून 25 एप्रिल 2023 पर्यंत आहे.

👉आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या पालकांनी पुढे काय करावे? यादी, अलॉटमेंट पुढील प्रक्रिया पहा येथे क्लिक करा

 

किती अर्ज दाखल झाले आणि प्रतीक्षा यादी

संपूर्ण महाराष्ट्रात आरटीई अंतर्ग 8823 शाळा येतात. या शाळांमध्ये 1,01,846 जागा रिक्त आहेत. तर यासाठी एकूण अर्ज 3,64,413 जणांनी केले होते. त्यापैकी 94,700 जणांची निवड झाली आहे. 81129 विद्यार्थ्यांची नाव प्रतीक्षा यादीत आहेत.

👉आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या पालकांनी यादी व पुढील प्रक्रिया पहा येथे क्लिक करा

 

महत्वाची माहिती आहे इतरांना देखील पाठवा👇

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!