Scholarship exam result महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या इयत्ता पाचवी (पूर्व उच्च प्राथमिक ) आणि आठवीच्या (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला.

राज्याच्या इयत्ता पाचवीचा निकाल २२.३१ टक्के तर आठवीचा निकाल १५.६० टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

👉शिष्यवृत्ती परीक्षा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यात इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा परिषदेच्या वतीने १२ फेब्रुवारी २०२३ रोजी ही शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. राज्यातील नऊ लाख ६७८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली. त्यातील आठ लाख ७० हजार १६२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी एक लाख ७० हजार २६८ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या ३१ हजार २५१ इतकी आहे.

राज्यात इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी पाच लाख ३२ हजार ८७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील पाच लाख १४ हजार १३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेतून एक लाख १४ हजार ७१० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर इयत्ता आठवीसाठी तीन लाख ६७ हजार ८०२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली, त्यातील तीन लाख ५६ हजार ३१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

त्यातील ५५ हजार ५५८ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहेत. इयत्ता पाचवीच्या १६ हजार ५३७ विद्यार्थी, तर आठवीच्या १४ हजार ७१४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत. तसेच शिष्यवृत्तीचे छापील गुणपत्रक आणि प्रमाणपत्र लवकरच शाळांना पोचविण्यात येईल, असे परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी स्पष्ट केले आहे.

👉शिष्यवृत्ती परीक्षा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांची आकडेवारी –

परीक्षेचे नाव : नोंदणी केलेले : उपस्थित राहिलेले : पात्र विद्यार्थी : शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी

इयत्ता पाचवी : ५,३२,८७६ : ५,१४,१३१ : १,१४,७१० : १६,५३७

इयत्ता आठवी : ३,६७,८०२ : ३,५६,०३१ : ५५,५५८ : १४,७१४

एकूण विद्यार्थी : ९,००,६७८ : ८,७०,१६२ : १,७०,२६८ : ३१,२५१

पुणे जिल्ह्यातील आकडेवारी –

इयत्ता : नोंदविलेले : उपस्थित : पात्र : शिष्यवृत्ती धारक : पात्रतेची टक्केवारी

पाचवी : ५५,१२९ : ५३,०८९ : १५,८३० : १,२०३ : २९.८१ टक्के

आठवी : ३२,३९६ : ३१,२४४ : ७,१४० : १,१०२ : २२.८५ टक्के

👉शिष्यवृत्ती परीक्षा निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ –

www.mscepune.in

https://www.mscepuppss.in

Home Page 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!