महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल (Scholarship Result ) मंगळवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आला आहे. 31 जुलैला परीक्षा पार पडल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून (MSCE Pune) या परीक्षेचा अंतरिम निकाल 7 नोव्हेंबर दिवशी जाहीर झाला होता.
त्यानंतर विद्यार्थ्यांना, शाळांना गुणपडताळणी आणि निकालाबाबत अन्य तांत्रिक आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला होता. आता अखेर या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शिष्यवृत्ती निकाल पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा
कसा पहाल शिष्यवृती परीक्षेचा निकाल?
mscepune.in किंवा mscepuppss.in वर .
होम पेज वर रिझल्ट लिंक पहा.
आता नव्या विंडो मध्ये तुमचा 11 अंकी आसन क्रमांक टाका.
त्यानंतर विषयनिहाय तुम्ही निकाल पाहू शकाल.
डायरेक्ट निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
शिष्यवृत्ती निकाल पाहण्यासाठी 👉येथे क्लिक करा
इयत्ता पाचवीचे 23.90 टक्के विद्यार्थी, तर आठवीचे 12.53 टक्के विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. राज्यभरातील इयत्ता पाचवीच्या एकूण 3, 82, 797 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 91,400 विद्यार्थी पात्र झाले. आठवीची परीक्षा 2,79,466 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 35,034 विद्यार्थी पात्र ठरले आहे.
राज्य परीक्षा परिषदेने 7 नोव्हेंबरला झालेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर केला होता. त्यानंतर 7 ते 17 नोव्हेंबर दरम्यान शाळेकडून गुण पडताळणीसाठीच्या अर्ज मागविण्यात आले होते. या अर्जाची छाननी करून मंगळवारी रात्री हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.