SSC GD Constable Exam 2022 : कर्मचारी निवड आयोगाने (SSC)
(SSC GD Constable) भरती परीक्षेची तारीख जारी केली आहे.
10 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 या कालावधीत एसएससी जीडी कॉन्स्टेबल परीक्षा (SSC GD Constable Exam) घेतली जाणार आहे. जीडी कॉन्स्टेबल भर्ती 2022 साठी लवकरच प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहे. उमेदवार एसएससीच्या ssc.nic.in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात किंवा खालील दिलेल्या क्लिक करुन प्रवेश पत्र पहा.
👉प्रवेश पत्र Download करण्यासाठी 👉👉यावर क्लिक करा
SSC GD Constable Exam 2022 : 45284 रिक्त पदांवर भरती
कर्मचारी निवड आयोगाकडून जीडी कॉन्स्टेबल भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी 10 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2023 दरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या भरती अंतर्गत सीमा सुरक्षा दल ( BSF – बीएसएफ ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ( CISF – सीआयएसएफ), केंद्रीय राखीव पोलीस दल ( CRPF -सीआरपीएफ), इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस ( ITBP – आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल ( SSB – एसएसबी), सचिवालय सुरक्षा दल ( SSF – एसएसएफ), नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB – एनसीबी) आणि आसाम रायफल्स या एकूण 45284 रिक्त पदांसाठी भरती करणार आहेत.
👉प्रवेश पत्र Download करण्यासाठी 👉👉यावर क्लिक करा
SSC GD Constable Admit Card : प्रवेश पत्र येथे डाऊनलोड करा
- SSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- येथे होम पेजवर, ‘ॲडमिट कार्ड’ पर्याय निवडा.
- आता ‘जीडी कॉन्स्टेबल’ – ॲडमिट कार्ड लिंकवर क्लिक करा.
- लॉगिन पेजवर क्रमांक/नोंदणीकृत आयडी किंवा उमेदवाराचे नाव आणि जन्मतारीख टाकून सबमिट करा.
- एसएससी जीडी कॉन्स्टेबल ॲडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.
- प्रवेश पत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.
SSC GD Constable 2023 : अशी असेल निवड प्रक्रिया?
एसएससी जीडी कॉन्स्टेबल (SSC GD Constable) भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांची निवड विविध परीक्षेद्वारे केली जाईल. यामध्ये संगणक आधारित परीक्षा (CBE), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), वैद्यकीय परीक्षा आणि कागदपत्र पडताळणी या प्रक्रियेचा समावेश असेल.
👉प्रवेश पत्र Download करण्यासाठी 👉👉यावर क्लिक करा