रुग्णालयात दाखल झालात तर चिंता नका करू, राज्य सरकारकडून मिळते तब्बल इतक्या लाखांची मदत
राज्य सरकारने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत वाढ करून प्रति वर्ष 5 लाख इतके आरोग्य संरक्षण प्रति कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता राज्यातील नागरिकांना प्रती कुटुंब 10 लाख इतका आरोग्य विमा सेवेचा लाभ मिळणार आहे. मात्र, या योजनेचे निकष काय आहेत हे जाणून घेऊ.
सरकारनेही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत वाढ करून प्रति वर्ष 5 लाख इतके आरोग्य संरक्षण प्रति कुटुंबाला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता राज्यातील नागरिकांना प्रती कुटुंब 10 लाख इतका आरोग्य विमा सेवेचा लाभ मिळणार आहे. मात्र, या योजनेचे निकष काय आहेत हे जाणून घेऊ.
जन आरोग्य विमा सेवेचे लाभार्थी कोण?
अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेले पिवळे, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना आणि केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबाना या योजनेचा लाभ घेता येतो. ही आरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे आणि अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना लागू करण्यात आली आहे. यासोबतच महाराष्ट्र कर्नाटक सीमा लगत असलेल्या सीमाभागातील नागरिक या योजनेचे लाभार्थी आहेत.