Irrigation Scheme- शेती ही चांगल्या सिंचन सुविधा असल्याशिवाय चांगले उत्पन्न देणारी परवडणारी होऊ शकत नाही हे वास्तव आणि सत्य आहे. याचा प्रत्येक शेतकऱ्याला याचा अनुभव आहे, अनेक हेक्टर शेती विचार केला तर बरेचसे क्षेत्र हे कोरडवाहू असल्यामुळे साहजिकच अशा शेतीतून मिळणारे उत्पादन देखील नगण्य असते.
त्यामुळे उपलब्ध पाण्यामध्ये पाण्याचे योग्य नियोजन करणे हे सूक्ष्म सिंचनामुळे शक्य होऊ शकते. यासाठी ठिबक सिंचनाच्या सोयी असणे खूप गरजेचे आहे. याकरिता शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात.
👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करुन बघा
अशा योजनांच्या माध्यमातून सरकारकडून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान मिळाल्याने शेतामध्ये सिंचनाच्या सोयी सहज उपलब्ध होतात व उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना मदत होते. राज्य शासनाकडून राष्ट्रीय कृषी विकास प्रती थेंब अधिक पीक योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना राबवली जाते व या माध्यमातून ठिबक सिंचनासाठी सरकारच्या माध्यमातून अनुदान दिले जाते.
हेही वाचा: म्हाडाच्या 49174 घरांसाठीची सोडत, लॉटरीत तुमचे नाव आहे का? यादी पहा
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना ही एक खूप महत्त्वाची योजना असून या माध्यमातून ठिबक सिंचनासाठी राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेतजमीन आहे असे सर्वच शेतकरी यासाठी पात्र आहेत.
परंतु यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब ही आहे की, संबंधित अर्जदार शेतकऱ्याने मागील सात वर्ष या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अर्जदार शेतकऱ्याकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, जमिनीचा सातबारा, आठ-अ चा उतारा, आणि लाभासाठी बँकेचे पासबुक असणे गरजेचे आहे.
👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करुन बघा
तसेच अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थींना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना जातीचे प्रमाणपत्र अनिवार्य असते. जाणून घेऊ या योजनेच्या माध्यमातून किती मिळते अनुदान? मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना एकूण खर्च मर्यादेच्या 80 टक्के आणि इतर शेतकऱ्यांना कर्ज मर्यादेच्या 75 टक्के एवढे अनुदान देण्यात येते.
यामध्ये मिळणाऱ्या अनुदानाचे स्वरूप पाहिले तर केंद्र सरकारच्या पंतप्रधान सूक्ष्म सिंचन योजनेतून 55 टक्के अनुदान मिळते तर उरलेले पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून 25 टक्के एवढे अनुदान मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे कराल? या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
👉अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करुन बघा
याकरिता mahadbtmahait.gov.in संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येतो तसेच या योजनेचे अधिक माहिती हवी असेल तर कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून तुम्ही अधिकची माहिती घेऊ शकता.
👉एकाच अर्जावर शेतकऱ्यांना मिळणार 14योजनांचा लाभ असा करा अर्ज