Talathi bharti ; राज्यभरातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे त्यांना २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान उत्तरपत्रिका पाहण्यासाठी (answer key) उपलब्ध करुन देण्यात येणार आहे उमेदवार खाली दिलेल्या वेबसाईट वर जाऊन उत्तरतालिका पाहू शकता.

Talathi bharti answer key ; उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवारांच्या ऑनलाईन लॉगिनमध्ये सोय करण्यात आली आहे.

तलाठी भरती उत्तरतालिका पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

उमेदवारांना काही हरकत असल्यास परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदविता येणार आहे. त्यासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हयातून जवळपास १६ हजारहून अधिक उमेदवारांनी तलाठी पदासाठी परीक्षा दिली आहे.

तलाठी भरती परीक्षा पार पडल्यानंतर आता भूमी अभिलेख विभागाकडून पुढील प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार आता परीक्षा दिलेल्या उमेदवारांना उत्तर तालिका (answer key) पाहण्यासाठी सोय उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

उत्तरे पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका, आक्षेप हरकत असल्यास परीक्षा घेतलेल्या टीसीएस कंपनीकडून लिंक उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्याकरिता आक्षेप अथवा हरकत नोंदवण्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवारांना परत केले जाणार आहे. तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील. या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार आहे. अशी माहिती परीक्षा समन्वयकांनी दिली. दरम्यान ही प्रक्रिया झाल्यानंतर निकाल संकेतस्थळावर जाहिर केला जाणार आहे. संकेतस्थळावर जाहिर केलेला निकाल अंतिम राहील.

तलाठी भरती उत्तरतालिका पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!