या स्टेप्स वापरून मिळवा तुमचा हरवलेला मोबाईल फोन
स्मार्टफोन,मोबाईल ट्रॅक करण्याच्या स्टेप्स खाली पहा
मोबाईल हरवल्यानंतर सुरुवातीला दुसऱ्या कोणाच्या उपलब्ध फोनवरून किंवा इतर कोणत्याही डिवाईसमधुन सीईआयआर (CEIR) या वेबसाईटवर जा
CEIR वेबसाईट ओपन झाल्यानंतर, तिथे तुम्हाला ब्लॉक (Block) हा पर्याय दिसेल तो निवडा.
हा पर्याय निवडल्यानंतर एक पेज दिसेल त्यावर तुमचा मोबाईल क्रमांक, आयएमईआय नंबर, स्मार्टफोनचे मॉडेल अशी मोबाईलची महत्वाची माहिती येथे मागितली जाईल ती माहिती तिथे भरा.
मोबाईलचा तपशील भरल्यानंतर तुम्हाला मोबाईल ट्रॅक करता येईल. तसेच ऍक्सेस ब्लॉककरून तुमच्या हरवलेल्या फोनचा वापर देखील थांबावता येऊ शकतो.
सीईआयआर CEIR या वेबसाईटवरून फोन ट्रॅक करण्यासाठी फोनचा पोलीस कंप्लेंट नंबर असणे आवश्यक आहे. जो तुम्हाला तक्रार नोंदवल्यानंतर दिला जातो.
अशा या पद्धतीने तुम्हाला तुमचा हरवलेला मोबाईल ट्रॅक करता येईल, तो तुमच्या हातात येईपर्यंत त्याचा कुठे गैर वापर होऊ नये म्हणून त्या मोबाईलचा वापर देखील तुम्हाला थांबवता येऊ शकतो.
Ancestral Land Record: अतिक्रमण केलेली जमीन मिळणार फक्त 2 दिवसांत परत