Tukadebandi Law: राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द; जमीनधारकांना कोणता फायदा होणार?
ही बाब लक्षात सरकारने आता तुकडेबंदी कायदा रद्द केलाय. राज्य सरकारने याबाबत एक ठोस कार्यपद्धती निश्चित केली असून त्याबाबत महत्त्वाची पावले उचलण्यास सुरुवात केलीय.
12 जुलै 2021 च्या शासकीय परिपत्रकानुसार जिरायत जमिनीसाठी किमान 20 गुंठे आणि बागायतसाठी 10 गुंठे क्षेत्राची अट लागू करण्यात आली होती. त्यामुळे 1,2 किंवा 3 गुंठ्यांमध्ये होणाऱ्या जमिनीच्या व्यवहारांना अडथळा निर्माण होत होता.
या निर्णयामुळे राज्यभरात अंदाजे पाच लाखांहून अधिक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकरी, लघु भूधारक, नागरी भागातील लहान प्लॉट खरेदी करणारे नागरिक यांना याचा फायदा होणार आहे. 1,000 चौरस फूटापर्यंतच्या प्लॉटधारकांना आता व्यवहार करण्यासाठी कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागणार नाहीये.
काय होणार फायदा?
तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले लहान जमिनींचे व्यवहार आता कायदेशीररित्या पूर्ण होऊ शकतील. विहीर, शेतरस्ता किंवा वैयक्तिक गरजेसाठी लहान भूखंड खरेदी-विक्री करणे सुलभ होणार आहे. जेथे नागरीकरण झाले आहे तेथे प्लॉट डेव्हलपमेंट, हाउसिंग स्कीम्स निर्माण होणार अडथळा दूर होण्यास मदत मिळेल. शहर आणि तालुका पातळीवरील रिअल इस्टेट व्यवहारांना गती मिळेल.
शासन निर्णय येथे जाणून घ्या