या कालावधीत पश्चिम विदर्भात रिमझिम स्वरूपाचा तर पूर्व विदर्भात मोठा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली या पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात ढगाळ हवामान राहणार असे त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय पंजाबरावांनी 11 डिसेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान पुन्हा एकदा महाराष्ट्रात अवकाळी पाऊस थैमान घालणार असे म्हटले आहे. unseasonal rain
जमिनीचे खाते उतारे सातबारा पहा ऑनलाईन
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, 11 डिसेंबरच्या सुमारास अरबी समुद्रात एक चक्रीवादळ तयार होणार आहे.
हे चक्रीवादळ पुढे ओमानच्या दिशेने सरकणार आहे. मात्र हे चक्रीवादळ जात असताना राज्यातील दक्षिण भागात मोठ्या पावसाची शक्यता आहे.
११ डिसेंबर नंतर सुरू होणारा पाऊस हा जवळपास 16 डिसेंबर पर्यंत राहील. या काळात उर्वरित राज्यात मात्र तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असं त्यांनी सांगितले आहे.
एकंदरीत, 15-16 डिसेंबर पर्यंत राज्यातील हवामान बिघडलेलेचं राहणार आहे. यामुळे आता डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात तरी थंडीचा जोर वाढतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.