Viral Video: भारतात नवीन शोध लावणाऱ्या जुगाडू लोकांची अजिबात कमतरता नाही. सोशल मीडियावर तुम्हाला अनेक टॅलेंटेड लोक भेटतील. देशामध्ये लोक इंजिनिअरिंगची डिग्री नसतानाही अनोखे शोध लावतात. भन्नाट देसी जुगाड करतात. आणि यातून त्यांच्यात असलेला वेगळेपणा ते सिद्ध करतात.

 

सोशल मीडियावर जबरदस्त जुगाड केलेले अनेक व्हिडीओ हे तुफान व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ आता सर्वाचं लक्ष वेधून घेत आहे. एका तरुणाने बेडला चक्क चालती-फिरती कार बनवलं आहे. रस्त्यावरून हा बेड जेव्हा जातो तेव्हा सर्वच जण त्याकडे कुतुहलाने पाहत आहेत.

 

वायरल व्हिडिओ येथे पाहा 

 

एका व्यक्तीने बेडचं रूपांतर कारमध्ये केलं आहे. या अनोख्या शोधात, त्याने कारची चाकं, मोटर आणि स्टीअरिंग बेडच्या आतमध्ये फिट केले. एवढंच नाही तर बेडच्या मध्यभागी ड्रायव्हरच्या सीटसाठीही जागा ठेवण्यात आली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

वायरल व्हिडिओ येथे पाहा 

 

हा मजेदार व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @noyabsk53 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत ३ कोटी ७७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. व्हिडीओवर लोक मजेशीर कमेंट्स करत आहेत.

 

Viral Video: बाईई..स्कूटी पार्क करायला गेली अन् कुठं घुसली व्हिडिओ झाला वायरल

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!