Voter EPIC: नवीन डिजिटल मतदान कार्ड डाऊनलोड करा मोबाईलवर
वोटर कार्डची डिजिटल कॉपीला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीचा वापर करू शकतात. पहिला म्हणजे मोबाइल अॅप (Voter Helpline) आणि दुसरा म्हणजे निवडणूक आयोगाची वेबसाइटवरून करू शकतात. जर तुमच्या फोनमध्ये अॅप नसेल तर तो अॅप डाउनलोड करावा लागेल किंवा आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन तुमचा मोबाइल नंबर ई-मेल आयडीवरून लॉग इन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Download e-EPIC हा पर्याय दिसेल. त्यानंतर मोबाइल नंबर किंवा वोटर कार्ड नंबर टाकून तुम्ही पीडीएफमध्ये आपले मतदान ओळखपत्र (वोटर कार्ड) डाउनलोड करू शकता. पीडीएफ फाइलमध्ये एक क्यूआर कोड दिसेल. त्याला स्कॅन केल्यानंतर पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसेल, त्यामुळे आपले कार्ड सुरक्षित राहण्यास ही मदत होणार आहे.
या दोन पद्धतीचा जरुर वापर करा..
1. मोबाईल अॅप (Voter Helpline) डाऊनलोड करा
2. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटचा वापर करा.