बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचे एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे.
29 नोव्हेंबर 2024 चे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगितले जात आहे. या सीसीटीव्हीच्या रुपाने खंडणी प्रकरणातला सर्वांत मोठा पुरावा मिळाल्याचे बोलले जाते. walmik karad
समोर आलेल्या व्हिडीओत वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी एकत्र असल्याचे दिसून येतात. दुपारी १२ वाजताच्या दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. विष्णू चाटे याच्या कार्यालयातील हे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासांत समोर आले आहे.
दुपारी १२ वाजता आरोपींनी एकत्रित बसूनच चाटे याच्या मोबाईवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच फोनवर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. पोलीस एफआयआरमध्येही तसाच उल्लेख आहे.
संपूर्ण व्हिडीओ येथे पाहा
संपूर्ण व्हिडीओ येथे पाहा
आवादा खंडणी प्रकरण आणि सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे कनेक्शन
खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड तब्बल १५ दिवसांनी पोलिसांसमोर आला. त्यानंतर १४ दिवसांच्या पोलीस तपासात खंडणी आणि खून प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला. त्यानंतर त्याच्यावर खुनाच्या कटात संशय असल्याचे कलम आणि मकोका अंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. सध्या वाल्मिक कराडची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल तुरुंगात करण्यात आली आहे.
संपूर्ण व्हिडीओ येथे पाहा